शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

सोलापूरात २० दिवसात ३०५ रिक्षांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 13:23 IST

सोलापुरात चांगला प्रतिसाद, परमिट खुले झाल्याचा बेरोजगारांना उपयोग

ठळक मुद्देपरिवहन विभागातर्फे जानेवारीपासून रिक्षांचे परमिट खुलेआॅनलाईन नोंदणी करून रिक्षा परमिट घेण्यासाठी युवकांची गर्दी

सोलापूर : परिवहन विभागाने रिक्षा परमिट खुले केल्याचा फायदा शहरातील साडेचार हजार बेरोजगारांनी घेतला आहे. गेल्या २० दिवसात शहरात ३०५ नव्या रिक्षांची आरटीओ कार्यालयात नोंदणी झाली आहे. 

बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे रिक्षा परमिट खुले करण्यात यावेत, अशी मागणी होत होती. परिवहन विभागातर्फे जानेवारीपासून रिक्षांचे परमिट खुले करण्यात आले. त्यामुळे आॅनलाईन नोंदणी करून रिक्षा परमिट घेण्यासाठी युवकांची गर्दी वाढली आहे. तीन महिन्यात साडेचार हजार परमिटसाठी नोंद झाली आहे. परमिट घेतलेल्यांना रिक्षा खरेदी करण्याची अट आहे. जानेवारीमध्ये दररोज १0 ते २0 नव्या रिक्षांची भर पडत होती. आता मार्चमध्ये दररोज ६0 ते ७0 रिक्षांची नोंदणी होत आहे.

शहरात यापूर्वीच्या परमिटच्या ६३00 रिक्षा होत्या. स्क्रॅप रिक्षा वाढल्याच्या तक्रारी आल्यावर आरटीओ व वाहतूक पोलिसांतर्फे संयुक्त मोहीम राबवून सुमारे १२00 स्क्रॅप रिक्षा पकडण्यात आल्या. आता नव्या साडेचार हजार रिक्षांची शहरात भर पडणार आहे. अशाप्रकारे शहरात सुमारे अकरा हजार रिक्षा रस्त्यावर धावणार असे चित्र दिसत आहे. 

प्रवास स्वस्त झाला- रिक्षांची संख्या वाढल्याने प्रवास स्वस्त झाला आहे. सध्या शहरात मनपा परिवहन बससेवेची यंत्रणा वाईट स्थितीत आहे. त्यामुळे या रिक्षांना चांगली कमाई होत आहे, पण बससेवा सुधारल्यावर मात्र रिक्षाचालकांच्या व्यवसायावर संकटे येऊ शकतात. सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेबाबत यापूर्वी नियुक्त केलेल्या समितीच्या अभ्यासानुसार १ लाख लोकसंख्येमागे ८00 रिक्षांची गरज असल्याचे म्हटले होते. सोलापूरची लोकसंख्या साडेनऊ लाख गृहीत धरल्यास ८ हजार रिक्षांची गरज भासणार आहे. पण आता परमिट खुले केल्यानंतर ही संख्या अकरा हजारावर जात आहे. त्यामुळे आता रिक्षाथांबे वाढवावे लागणार आहेत.

सध्या शहरात ३३९ रिक्षाथांबे आहेत. एका थांब्यावर पाच रिक्षा असाव्यात, असे व्यवसाय सूत्र आहे. पण बस व रेल्वे स्थानकावर रिक्षांची मोठी संख्या असते. राज्यात सर्वात जास्त सोलापुरात प्रतिसाद मिळाला आहे. नाशिकला अवघे ४00 परमिट घेण्यात आले आहेत. 

बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी रिक्षा परमिट खुले करण्यात आले. याला सोलापुरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महिलांसाठी परमिट खुले आहेत. पण फक्त एका संस्थेने २२ महिलांना परमिट मिळवून दिले, पण त्यांनी अद्याप रिक्षांची नोंदणी केली नाही. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना मोफत परमिट दिले आहे. - बजरंग खरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसAutomobile Industryवाहन उद्योग