विश्वास संपादन करून ३० हजार रुपयांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:46 IST2021-02-05T06:46:24+5:302021-02-05T06:46:24+5:30
सोनंद येथील अनिल पीतांबर गौड हे २८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये असताना एका अनोळखी इसमाने हॉटेलमध्ये ...

विश्वास संपादन करून ३० हजार रुपयांना गंडा
सोनंद येथील अनिल पीतांबर गौड हे २८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये असताना एका अनोळखी इसमाने हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्याने निरंकारी भक्त असल्याचे सांगून मला हॉटेलचा व्यवसाय जमतो, एक दिवस तुमच्या घरात राहू द्या, अशी विनंती केली असता त्यांनी त्यास एक दिवस घरी ठेवून घेतले. दुसऱ्या दिवशी गौड यांना समोसा कसा तयार करायचा ते शिकवले होते. दरम्यान, अनिल गौड यांची तो निरंकारी भक्त असल्याची खात्री पटल्यानंतर त्यास हॉटेलचे साहित्य आणण्यासाठी ५ हजार रुपये दिले होते. त्याने हॉटेलसाठी दोन कढई, एक शेगडी, पाच प्लेट, चमचा, असे साहित्य आणून गौड यांचा विश्वास संपादन केला. मंगळवारी कामासाठी अनिल गौड यांच्याकडून ३० हजार रुपये घेऊन जाताना त्याने दुचाकी गौड यांच्याकडे ठेवली. त्यानंतर अनिल गौड यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत अनिल पीतांबर गौड यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी शशिकांत येजमाने (रा. कुमठा नाक, सोलापूर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.