धनादेश न वटल्याप्रकरणी ३ महिने कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:21 IST2021-03-20T04:21:19+5:302021-03-20T04:21:19+5:30
याबाबत माढा येथील राजाराम कोंडीबा देवकर यांनी त्यांच्या नातेसंबंधातील धनाजी पांडुरंग वसेकर (रा. माढा) यांना पेट्रोल पंपाच्या व्यवसायाकरिता आर्थिक ...

धनादेश न वटल्याप्रकरणी ३ महिने कारावास
याबाबत माढा येथील राजाराम कोंडीबा देवकर यांनी त्यांच्या नातेसंबंधातील धनाजी पांडुरंग वसेकर (रा. माढा) यांना पेट्रोल पंपाच्या व्यवसायाकरिता आर्थिक अडचण असल्याने ६५ हजार रुपये फेब्रुवारी २०१४ रोजी हातउसने म्हणून रोख दिले होते. ही रक्कम वेळोवेळी मागणी करूनसुद्धा वसेकर यांनी मुदतीत परत केली नाही.
मात्र, सदर रकमेपोटी वसेकर यांनी देवकर यांना बँक ऑफ इंडिया माढा शाखेचा धनादेश दिलेला होता. तो धनादेश देवकर यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया माढा शाखेतील खात्यावर जमा केला असता सदर चेक वटला नाही.
या प्रकरणी देवकर यांनी वसेकर यांच्या विरोधात माढा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी राजाराम देवकर यांच्या वतीने ॲड. शीतलकुमार उपाध्ये यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे ॲड. पी. आर. कारंजकर यांनी काम पाहिले.