शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Exclusive; उजनी धरणावर २४ तासात होतेय ३ लाख युनिट विजेची निर्मिती

By appasaheb.patil | Updated: September 5, 2020 13:14 IST

उजनी धरणावरील वीजनिर्मिती केंद्र कार्यान्वित; इंदापूर, वालचंदनगर अन् बारामतीला वापरली जातेय वीज

ठळक मुद्देउजनी धरणातील पाणीसाठा १०० टक्यांच्या वर गेला तरच या वीजनिर्मिती केंद्राला पाणी सोडले जाते़एका तासाला १२ हजार युनिट वीज निर्मिती होत असून, यासाठी १ हजार ६०० क्युसेक पाण्याची आवश्यकता

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी समजल्या जाणाºया उजनी धरणातील पाणीसाठा १०० टक्के पार झाला आहे़ दरम्यान, धरणातील पाणी वीजनिर्मिती प्रकल्पाला सोडण्यात आल्यामुळे धरणावरील वीजनिर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे़ सध्या २४ तासाला ३ लाख युनिट विजेची निर्मिती होत असल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता आऱ एस़ कदम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

राज्यात असे विविध ठिकाणी चार प्रकल्प असून, यात उजनी वीज निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या जलविद्युत विभागाच्या मालकीचा असून, हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडे भाडेतत्त्वावर हस्तांतरित केला आहे. अशा प्रकारचा रिव्हरसेबल प्लांट महाराष्ट्रात जायकवाडी येथे १२ मेगावॅट, भाटघर येथे २५ मेगावॅटचे दोन संच कार्यरत आहेत, असे चार प्लांट आहेत. या प्रकल्पाची खोली जमीन लेव्हलपासून शंभर फूट खोलीवर असून, टर्बाईनच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते. भीमानगर येथील वीजनिर्मिती प्रकल्पातून निर्माण होणारी वीज इंदापूर येथे १३२ केव्ही सबस्टेशनला जोडली आहे. तेथून वालचंदनगरला वीज पुरवली जाते व भीमानगर येथून सीना-माढा पंपहाऊसलादेखील वीज पुरवठा केला जाऊ शकतो. त्यासाठी भीमानगर इथे तशी व्यवस्था केली आहे. जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या निर्मितीनंतर याच धरणावर मे १९९४ रोजी वीज प्रकल्प कार्यान्वित झाला.---------१०० दिवसच चालतो हा प्रकल्पउजनी धरणातील पाणीसाठा १०० टक्यांच्या वर गेला तरच या वीजनिर्मिती केंद्राला पाणी सोडले जाते़ अन्यथा हा प्रकल्प बंदच असतो़ वर्षभरात केवळ १०० दिवसच हा प्रकल्पातून विजेची निर्मिती करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगितले़ वीज निर्मितीसाठी वापरलेले पाणी परत धरणात पाणी सोडले जाते. एका तासाला १२ हजार युनिट वीज निर्मिती होत असून, यासाठी १ हजार ६०० क्युसेक पाण्याची आवश्यकता आहे. २४ तासांत दोन लाख ८८ हजार युनिट वीज निर्मिती होत असून, रिव्हर्स प्लांट (पाणी परत धरणात सोडले जाते) असल्याने वर्षात तीन ते चार महिनेच हा प्रकल्प चालतो़

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणmahavitaranमहावितरण