तरुणाला मारहाण करत खिशातून काढले २८ हजार रुपये, चौघांवर गुन्हा
By रूपेश हेळवे | Updated: August 18, 2023 14:34 IST2023-08-18T14:34:27+5:302023-08-18T14:34:54+5:30
रस्त्यावरून जाणार्या इसमाला अडवत त्याला दांडक्याने मारहाण करत चौघांनी मिळून खिशातील २८ हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

तरुणाला मारहाण करत खिशातून काढले २८ हजार रुपये, चौघांवर गुन्हा
सोलापूर : रस्त्यावरून जाणार्या इसमाला अडवत त्याला दांडक्याने मारहाण करत चौघांनी मिळून खिशातील २८ हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शरणप्पा शिवराया हांडे ( वय ३५, रा. साईनगर, अक्कलकोट रोड) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हांडे हे ९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास समाधान नगर येथिल मैदानातून जात होते. तेव्हा आरोपी रमजान गफुर बागवान, रेहान साजन मकानदार, वाहिद शेख, सद्दाम शेख ( सर्व रा. सोलापूर ) हे तेथे दारू पित बसले होते. तेव्हा आरोपींनी विनाकारण फिर्यादी हांडे यांना अडवत त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.
शिवाय त्यांच्या खिश्यातील रोख २८ हजार रुपये काढून घेतले. त्यावेळी आरोपी बागवान याने दांडक्याने फिर्यादीच्या कानावर मारून जखमी केले. या प्रकरणी वरील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई रजपूत करत आहेत.