दत्ता यादव -सातारा -- मानवी सांगांडे सापडल्यानंतर अनेकदा पोलीस दलात खळबळ उडत असते. अशा सांगांड्यांची ओळख कशी पटवायची हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर असतो. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात २८ मानवी सांगांडे सापडले आहेत. तर अद्याप ९ सांगांड्यांची ओळख पटली नाही. काही दिवसांपूर्वी बोरगाव आणि वाई येथे मानवी सांगांडे सापडले होते. यापार्श्वभूमीवर असे सांगांडे सापडल्यानंतर पोलिसांचा नेमका तपास कसा होतो, याचा शोध घेतला असता अनेक बाबी समोर आल्या. मानवी सांगांडा सापडल्यानंतर पोलीस सुरूवातीला तो सांगांडा जप्त करतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून त्या सांगांड्याचे जागेवरच शवविच्छेदन केले जाते. प्रथम दर्शनी तो सांगांडा पुरुष की स्त्री जातीचा आहे, हे नमूद केले जाते. पुरुषाचा सांगाडा हा मांडीमध्ये निमुळता असतो, तर स्त्रीचा सांगाडा हा आकाराने मोठा असतो. मात्र तुटलेल्या अवस्थेत सांगाडा असेल तर तो सांगांडा पुरुषाचा की स्त्रीचा, याचा शोध घेणे अवघड असते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अहवालावर विसंबून न राहाता सांगांड्याचे नमुने मुंबई येथील फॉरेन्सीक लॅबमध्ये डीएनए चाचणीसाठी पाठविले जातात. या चाचणीचा अहवाल आल्यानंतरच मानवी सांगांडा कोणाचा आहे, हे ओळखले जाते. एवढेच नव्हे तर सांगांड्याचे वयही समजते. तसेच सापडलेल्या सांगांड्याची आणि त्याच्या नातेवाईकाची ओळख पटवायची असेल तर दोघांचेही डीएनए नमुने घेतले जातात. ते नमुने प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर त्याच्या नातेवाईकांची ओळख पटते. मानवी सांगांड्यावरील हाडावर कोणत्याही शस्त्राचे घाव असतील तर त्याचा खून झाला आहे, असे समजले जाते. जर हाडावर निसळर डाग पडले असतील तर त्याला वीषबाधा झाल्याचे पुढे येते. छातीजवळील सापळ्याची टेस्ट घेतल्यानंतर बुडून (ब्राऊनिंग) मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते. मात्र सांगांड्याची ओळख पटत नाही तोपर्यंत पोलिसांना कसोशीने तपास करावा लागतो. बेपत्ता व्यक्तीचा शोधजिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत २८ मानवी सांगांडे सापडले आहेत. तसेच ९ सांगांड्यांची अद्यापही ओळख पटलेली नाही. मानवी सांगांडे सापडल्यानंतर पोलीस सुरूवातीला बेपत्ता व्यक्तिचा शोध घेत असतात. त्यातून माहिती समोर येते. पोलीस करतात सांगाड्यांचे दफन मानवी सांगांड्याची ओळख पटल्यानंतर पोलीस तो सांगांडा जमीनीमध्ये पुरतात. मात्र एखाद्या नातेवाईकाने संबंधित व्यक्तिचा खून झाला आहे, असा आक्षेप घेतल्यास तो सांगांडा तहसीलदारांच्या आदेशाने पुन्हा उकरून बाहेर काढला जातो. त्यानंतर तो सांगांडा पुन्हा फॉरेन्सीक लॅबला पाठविला जातो. त्यामुळे शक्यतो सांगांड्याचे दहन केले नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
तीन वर्षांत सापडले २८ मानवी सांगाडे
By admin | Updated: August 12, 2014 23:14 IST