केंद्र व राज्य शासनाकडून मनपाला २७४ कोटी अनुदान

By Admin | Updated: July 6, 2014 00:19 IST2014-07-06T00:19:55+5:302014-07-06T00:19:55+5:30

जिल्हा नियोजनमधून मिळाले ६५ कोटी ३९ लाख

274 Crore grant from the Central and State Governments | केंद्र व राज्य शासनाकडून मनपाला २७४ कोटी अनुदान

केंद्र व राज्य शासनाकडून मनपाला २७४ कोटी अनुदान


सोलापूर : महानगरपालिकेस गतवर्षी व चालू वर्षात केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांपोटी २७४ कोटींचे अनुदान मिळाले आहे.
महापालिकेला सन २०१२-१३ व २०१३-१४ या आर्थिक वर्षात विविध योजनांपोटी मिळालेले अनुदान पुढीलप्रमाणे आहे. एलबीटी करापोटी विशेष अनुदान १५ कोटी, मुद्रांक शुल्क अधिभार १ टक्का: २५ कोटी ४० लाख, रस्ते अनुदान: ९ कोटी ३५ लाख, अल्पसंख्याकबहुल क्षेत्रविकास: ३९ लाख ८४ हजार, अनुसूचित जाती व नवबौद्ध घरकूल योजना: २५ कोटी ६९ लाख, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान (मलनिस्सारण): २६ कोटी ८४ लाख, रस्ते: ४६ कोटी ९४ लाख, यूआयडीएसएसएमटी: ३२ कोटी ३८ लाख, चालू वर्षी विशेष अनुदान: १० कोटी, महापालिका क्षेत्रात प्राथमिक सोयीसुविधा पुरविण्यासाठी विशेष अनुदान: २३ कोटी ३ लाख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना: १ कोटी ६८ लाख, १३ वे वित्त आयोग: ४६ कोटी ६७ लाख, घर तेथे शौचालय अनुदान: १० कोटी ९१ लाख, यूआयडी (आधार): ३ लाख, अग्निशमन व आणीबाणी सेवेचे बळकटीकरण: चालू वर्षी २३ लाख ९६ हजार, पथदिव्यांचे ऊर्जासंवर्धन तंत्रज्ञान पथदर्शीय प्रकल्प राबविणे: २० लाख.
जिल्हा नियोजन: महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान जिल्हास्तर रस्ते: ४८ लाख ८२ हजार, जिल्हास्तर रस्ते: ४ कोटी, जिल्हास्तर पाणीपुरवठा १ ते १० कामे: ९४ लाख २९ हजार, वडकबाळ ते होनमुर्गी पाईपलाईन: ४९ लाख ५ हजार, रस्ते, ड्रेनेज, पाणी: २ कोटी, स्मशानभूमी सुधारणा: ५६ लाख २२ हजार, सहायक अनुदान रचना: ३ कोटी ३९ लाख, महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान (जिल्हास्तर): ४ कोटी ६ लाख, डीपीडीसी (आमदार): ५ लाख, डीपीडीसी (खासदार): ९४ लाख, नागरी दलितेतर अनुदान: २३ लाख ८४ हजार, अंगणवाडी केंद्र इमारत बांधकाम: ४ लाख ५० हजार, टंचाई कामांतर्गत पाणीपुरवठा योजनेस अनुदान: १ कोटी ३७ लाख, पुरातन वास्तू संवर्धन: ४५ लाख, नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा: ३३ लाख १९ हजार, दलित वस्ती सुधारणा: ३ कोटी १२ लाख, सीसी कॅमेऱ्यासाठी अनुदान: १ कोटी ४० लाख, स्कॅनर खरेदीसाठी अनुदान: ३६ लाख ९६ हजार, महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर कामे: ४१ कोटी १२ लाख. यातील २० कोटी ५६ लाख अनुदान मिळाले असून, उर्वरित २० कोटी ५६ लाख येणे.

Web Title: 274 Crore grant from the Central and State Governments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.