निवडणूक कामाला दांडी मारणाऱ्यांना २६६ जणांवर फौजदारी
By Admin | Updated: February 3, 2017 17:23 IST2017-02-03T17:23:44+5:302017-02-03T17:23:44+5:30
निवडणूक कामाला दांडी मारणाऱ्यांना २६६ जणांवर फौजदारी

निवडणूक कामाला दांडी मारणाऱ्यांना २६६ जणांवर फौजदारी
निवडणूक कामाला दांडी मारणाऱ्यांना २६६ जणांवर फौजदारी
सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या कामाला दांडी मारणाऱ्या २६६ कर्मचाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याची नोटीस मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी काढली आहे.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी सर्व तयारी केली आहे़ मनपाचे विविध विभाग सज्ज झाले आहेत़ निवडणुक कामाकरिता ४१६० कर्मचाऱ्यांना ड्युटी देण्यात आली आहे. मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणाऱ्या मतदान केंद्राधिकारी, सहायक, पोलिंग अधिकाऱ्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्षांसाठी ईव्हीएम मशीनचा वापर, पॅकिंग करणे आदींबाबत प्रशिक्षण देण्यात आले. वारंवार कळवूनही यातील २६६ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला दांडी मारण्यात आल्याचे दिसून आले.
या कारवाईमुळे मनपा अधिकारी, कर्मचारी वर्तुळात खळबळ उडाली आहे़ यापुढे निवडणुक कामात हयगय व कामचुकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा विजयकुमार काळम-पाटील यांनी दिला आहे़