२६२ वृद्ध अन् दिव्यांगानी बजावला मतदानाचा हक्क; घरबसल्या आपला मतदानाचा हक्क बजावला
By दिपक दुपारगुडे | Updated: May 6, 2024 20:30 IST2024-05-06T20:30:00+5:302024-05-06T20:30:15+5:30
अक्कलकोट तालुक्यातील ८५ वर्षे वयापेक्षा जास्त असलेल्या व दिव्यांग अशा एकूण २६२ मतदारांनी घरबसल्या आपला मतदानाचा हक्क बजावला. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी ३६९ बूथ असून ५ सहायक मतदान केंद्र आहेत.

२६२ वृद्ध अन् दिव्यांगानी बजावला मतदानाचा हक्क; घरबसल्या आपला मतदानाचा हक्क बजावला
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील ८५ वर्षे वयापेक्षा जास्त असलेल्या व दिव्यांग अशा एकूण २६२ मतदारांनी घरबसल्या आपला मतदानाचा हक्क बजावला. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी ३६९ बूथ असून ५ सहायक मतदान केंद्र आहेत.
निवडणूक कामासाठी ४१ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे, अतिरिक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनायक मगर, अप्पर तहसीलदार श्रीकांत कांबळे, नायब तहसीलदार संजय भंडारे, निवासी तहसीलदार विकास पवार, निवडणूक तहसीलदार विजयकुमार गायकवाड, गटविकास अधिकारी शंकर कवितके, मुख्याधिकारी आतिश वाळुंज, गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे, पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे, मंडल अधिकारी मास्टर ट्रेनर परमेश्वर व्हसुरे, सिद्धेश्वर पारगोंडे निवडणूक विभागातील सर्व कर्मचारी व तलाठी यांनी काम पाहिले.