शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बार्शी तालुक्यातील २४ हजार १३१ शेतकºयांची बँक खातीच नसल्याने ४ कोटी दुष्काळी निधी बँकेतच पडूनच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 13:10 IST

एकीकडे दुष्काळी निधी मिळत नसल्याची शेतकºयांची ओरड होत असताना दुसरीकडे बार्शी तालुक्यातील २४ हजार १३१ शेतकºयांचे बँकेत खातेच नसल्याने राज्य शासनाकडून आलेला ३ कोटी ९९ लाख ५६ हजार ६७ रुपये इतका दुष्काळी निधी महसूल खात्याकडे पडून आहे

ठळक मुद्देशेतकºयांनी बँकेत खाते उघडून त्याचा क्रमांक देण्याचे आवाहन तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी केले आहे.   पीक विम्याचे शेतकरी वगळून ६६ हजार ६५४ खातेदारांसाठी ११ कोटी ९७ लाख ३४ हजार ३४२  रुपये बार्शी तालुक्यासाठी उपलब्ध शेतकºयांची यादी संबंधित गावच्या तलाठ्यांनी गावातील चावडीच्या फलकावर प्रसिद्ध केलेली असतानासुद्धा यासाठी पात्र असलेल्यांनी खाते नंबर दिलेला नाही

भ. के. गव्हाणेबार्शी दि २५ : एकीकडे दुष्काळी निधी मिळत नसल्याची शेतकºयांची ओरड होत असताना दुसरीकडे बार्शी तालुक्यातील २४ हजार १३१ शेतकºयांचे बँकेत खातेच नसल्याने राज्य शासनाकडून आलेला ३ कोटी ९९ लाख ५६ हजार ६७ रुपये इतका दुष्काळी निधी महसूल खात्याकडे पडून आहे. दरम्यान, शेतकºयांनी बँकेत खाते उघडून त्याचा क्रमांक देण्याचे आवाहन तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी केले आहे.   ज्या शेतकºयांनी पीक विम्याचे हप्ते भरले आहेत, अशा शेतकºयांना नुकसानभरपाई मिळाली आहे;  मात्र त्यांच्या ज्वारी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने आर्थिक नुकसान देण्याचे जाहीर केले. त्याप्रमाणे पीक विम्याचे शेतकरी वगळून ६६ हजार ६५४ खातेदारांसाठी ११ कोटी ९७ लाख ३४ हजार ३४२  रुपये बार्शी तालुक्यासाठी उपलब्ध झाले होते. याबाबत महसूल विभागाने आवाहन केल्याप्रमाणे आजपर्यंत खाते नंबर मिळालेले १२ जानेवारी २०१८ पर्यंत ४२,२४६ शेतकºयांचे ४९ हजार ९९५.३६ हेक्टरसाठी ७ कोटी ९७ लाख ९४ हजार ११३ रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी संबंधित बँकेकडे जमा करण्यात आल्याचे तहसीलदार यांनी सांगितले.  राहिलेले ३ कोटी ९९ लाख ५६ हजार ६७९ रुपये अनुदानाची रक्कम ही केवळ २४,१३१ बाधित शेतकºयांचे २५ हजार ७७४ हेक्टर क्षेत्राचे असून, त्यांचे बँक खाते नंबर संबंधित तलाठ्याकडे उपलब्ध नसल्यामुळे जमा करण्यात आले नाहीत. त्यासाठी अशा शेतकºयांची यादी संबंधित गावच्या तलाठ्यांनी गावातील चावडीच्या फलकावर प्रसिद्ध केलेली असतानासुद्धा यासाठी पात्र असलेल्यांनी खाते नंबर दिलेला नाही. तरी पात्र असलेल्यांनी तातडीने आपल्या बँकेच्या खातेपुस्तिकेची छायांकित प्रत तलाठ्यांकडे जमा करण्याबाबत तहसीलदार यांनी कळविले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी