सोलापुरात 21 लाखांची रोकड जप्त
By Admin | Updated: January 18, 2017 14:39 IST2017-01-18T14:39:03+5:302017-01-18T14:39:03+5:30
सोलापूर महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची देवाण-घेवाण व पैशांचा पुरवठा होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वाहन तपासणी सुरू ठेवली आहे.

सोलापुरात 21 लाखांची रोकड जप्त
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 18 - सोलापूर महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची देवाण-घेवाण व पैशांचा पुरवठा होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वाहन तपासणी सुरू ठेवली आहे. याच नाकाबंदी दरम्यान तुळजापूर नाक्याहून स्थिर सर्वेक्षण पथकाने 21 लाख 44 हजार रुपयांची रोकड जप्त केली.
निवडणूक आयोगाने महानगर पालिका निवडणुकीत वाहनांची तपासणी करण्यावर भर दिला आहे. यासाठी निवडणूक आयोगाने पोलीस यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. मिथेनॉलमिश्रित दारूची तस्करी होण्याची शक्यता आहे. तसेच शस्त्रांची व पैशांची तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहराती विविध भागात चेक नाके उभारण्यात आले आहेत.
तुळजापूर नाका येथे सर्वेक्षण पथकाने एमएच 13 बीएन 1488 या कारमधुन तब्बल 21 लाख 44 हजार रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणी एकास ताब्यात घेतले आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एका व्यापा-याला हरभरा विक्री करुन रक्कम सोलापूरला आणल्याचे ताब्यात घेतलेल्या इसमाने अशी माहिती पोलिसांना दिली. जप्त रक्कमेमध्ये 2000 व 500 रुपयांच्या नवीन नोटांचा समावेश आहे.
ही कारवाई जोडभावी पेठ पोलीस ठाण्यांचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण राठोड, हवालदार आवचारे, पोकॉ. केदार, माने, मुजावर आदींनी ही कामगिरी केली.
शहरात स्थिर सर्वेक्षण पथक विविध भागात 24 तास फिरत आहेत. परजिल्ह्यातील तसेच आपल्या जिल्ह्यातील संशयास्पद वाहन दिसले तर थांबविले जात आहे. वाहनाची झडती घेण्याबरोबर कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. - सूर्यकात पाटील, गुन्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
या ठिकाणी आहे सुरू नाकाबंदी
शहरात आठ ठिकाणी चेक पोस्ट शहरातील जुना पुना नाका, बाळे नाका, तुळजापूर नाका, हैद्राबाद रोड, देगाव नाका, नवीन हैद्राराबाद नाका, होटगी व विजापूर नाका या आठ ठिकाणी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेक पोस्ट उभारले आहेत.