२० वर्षीय युवती सकाळी अभ्यास करायला उठली अन् थोड्याच वेळात मृत्यू झाला
By रूपेश हेळवे | Updated: December 15, 2022 15:02 IST2022-12-15T15:01:26+5:302022-12-15T15:02:15+5:30
तिला वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

२० वर्षीय युवती सकाळी अभ्यास करायला उठली अन् थोड्याच वेळात मृत्यू झाला
सोलापूर - घरातील गच्चीवर विजेचा शॉक लागल्याने तरूणीचा मृत्यू झाला. श्रद्धा बाबासाहेब बनसोडे ( वय २०, रा. उत्तर सदर बाझार) असे मृत तरूणीचे नाव आहे. ही घटना गुरूवारी सकाळी उत्तर सदर बाझार परिसरात सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
श्रद्धा ही लॅब टेक्निशियनचा कोर्स करत होती. गुरूवारी परीक्षा असल्यामुळे ती सकाळी लवकर उठून अभ्यासाला बसली. त्यानंतर ती सात वाजण्याच्या सुमारास घराच्या गच्चीवर गेली. त्यावेळी तेथील बांधकामासाठी असलेल्या पिलरमधील बारला हात लागल्यानंतर तिला विजेचा शॉक बसला. तिला वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.