बसमध्ये चढताना २० हजारांचा खिसा कापला
By Admin | Updated: May 9, 2014 00:31 IST2014-05-08T20:15:18+5:302014-05-09T00:31:02+5:30
करमाळा : शेतीच्या कामासाठी बँकेतून काढलेले २० हजार रुपये करमाळा एस.टी.बसस्थानकात एस.टी.बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने खिसा कापून चोरून नेले, ही घटना मंगळवारी दुपारी दीड वाजता घडली.

बसमध्ये चढताना २० हजारांचा खिसा कापला
करमाळा : शेतीच्या कामासाठी बँकेतून काढलेले २० हजार रुपये करमाळा एस.टी.बसस्थानकात एस.टी.बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने खिसा कापून चोरून नेले, ही घटना मंगळवारी दुपारी दीड वाजता घडली.
व्यंकट विठोबा जगदाळे (वय-६३, रा.हिसरे, ता.करमाळा) यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा करमाळा येथून शेतीच्या कामासाठी २० हजार रुपये मंगळवारी दुपारी १.३० वा काढले आणि करमाळा बसस्थानकावर येऊन ते नाशिक-सोलापूर या एस.टी.बसमध्ये चढत असताना खूप गर्दी असल्याने या गर्दीचा फायदा घेऊन खिशात हात घालून अज्ञात चोरट्याने रक्कम काढून घेतली व पोबारा केला. या प्रकरणी व्यंकट जगदाळे याने पोलिसात फिर्याद दाखल केली असून, भादंवि ३७९अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या चोरीचा तपास हवालदार चव्हाण करीत आहेत. वार्ताहर.