मारहाण करून सेवानिवृत्त शिक्षकाकडे मागितली २० लाखांची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:43 AM2021-02-21T04:43:36+5:302021-02-21T04:43:36+5:30

याप्रकरणी अष्टविनायक अपार्टमेंट मालक तथा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शिवाजी पांडुरंग नवले (रा. एखतपूर रोड, सांगोला) यांनी फिर्याद दाखल केली. ...

20 lakh ransom demanded from a retired teacher by beating him | मारहाण करून सेवानिवृत्त शिक्षकाकडे मागितली २० लाखांची खंडणी

मारहाण करून सेवानिवृत्त शिक्षकाकडे मागितली २० लाखांची खंडणी

Next

याप्रकरणी अष्टविनायक अपार्टमेंट मालक तथा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शिवाजी पांडुरंग नवले (रा. एखतपूर रोड, सांगोला) यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी भाडेकरू कडुबा खरात, त्याचे साथीदार ढोबळे, ढावरे यांच्यासह इतर ४ अनोळखी इसमांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शिवाजी नवले यांची मस्के कॉलनीसमोर १५ फ्लॅट असलेली अष्टविनायक अपार्टमेंट बिल्डिंग आहे. शिवाजी नवले यांच्याकडून कडुबा खरात यांनी सन २०१४ मध्ये याच अपार्टमेंटमधील एक प्लॅट भाड्याने घेऊन राहत होते. मात्र ते वेळच्यावेळी भाडे देत नसल्याने नवले यांनी त्यांना फ्लॅट खाली करण्यास सांगितले. तसेच त्यांनी त्याच बिल्डिंगमधील मोहन शिवाजी अवताडे यांच्याकडून दुसरा फ्लॅट घेऊन सन २०१५ पासून त्या ठिकाणी राहत आहेत. दरम्यान त्यांच्याकडे ६० हजार रुपये भाडे थकीत असून, याच बिल्डिंगमध्ये गेल्या वर्षभरापासून ढावरे त्यांच्या प्लॉटमध्ये भाड्याने राहण्यास आहे. त्यांच्याकडेही १५ हजार रुपये भाडे थकीत आहे.

१९ फेब्रुवारी रोजी दु. १२ च्या सुमारास शिवाजी नवले यांनी कडुबा खरात यांना फोनवरून ६० हजार रुपये थकीत भाड्याची मागणी केली. यानंतर त्यांनी दु. १ च्या सुमारास फोन करून शिवाजी नवले यांना मार्केट यार्डासमोर बोलवून घेतले. तेथे त्याचे साथीदार ढोबळे, ढावरे इतर ४ अनोळखी इसमांना बोलावून घेतले. यावेळी ढावरे यांनी तू घरभाड्यासाठी माझ्या पत्नीला फोन का करतो, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो, पोलिसांत आमची खूप ओळख आहे, असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी खरात, ढोबळेसह ४ अनोळखी इसमांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कडुबा खरात ढावरेसह एका अनोळखी इसमाने शिवाजी नवले यांना जबरदस्तीने छोटा हत्ती टेम्पोत बसवून सांगोला-मंगळवेढा रोडवरील स्मशानभूमीत घेऊन गेले. तेथे खरात यांनी नवले यांना लाकडी दांडक्याने पाठीवर मारहाण करून अनोळखी इसमाने डाव्या पायावर काठीवर मारहाण केली.

त्यावेळी खरात याने नवले यांच्या खिशातून मोबाइल काढून घेऊन त्यांच्या फोन पे वरून २ हजार रुपये त्यांच्या इतर कोणत्यातरी खात्यात ट्रान्स्फर केले व तुझ्यावर गुन्हा दाखल करणार आहे, अशी धमकी दिली. त्यांनी एवढ्यावरच न थांबता शिवाजी नवले यांना जबरदस्तीने त्याच टेम्पोतून फुले चौकात नेऊन त्या ठिकाणी १०० रुपयांचा स्टॅम्प खरेदी करून पुन्हा त्याच टेम्पोत बसवून पंढरपूर रोडवरील एका हॉटेलजवळ नेऊन तेथे कोऱ्या स्टॅम्पवर जबरदस्तीने सह्या घेऊन प्रशांत हॉटेलमध्ये जबरदस्तीने दारू पाजली. यानंतर शिवाजी नवले यांचा मुलगा राजेंद्र यास फोन करून तुझ्या वडिलांवर गुन्हा दाखल करणार आहे, तुला हे प्रकरण मिटवायचे असेल तर २० लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिल्याचे शिवाजी नवले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक नागेश यमगर करीत आहेत.

Web Title: 20 lakh ransom demanded from a retired teacher by beating him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.