रस्त्यांच्या कामासाठी २० कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:23 IST2021-05-27T04:23:52+5:302021-05-27T04:23:52+5:30

सांगोला : सांगोला तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था बिकट झाली होती. यासाठी प्रस्तावित केलेल्या तीन रस्त्यांच्या कामांना प्रधानमंत्री ग्रामसडक ...

20 crore sanctioned for road works | रस्त्यांच्या कामासाठी २० कोटी मंजूर

रस्त्यांच्या कामासाठी २० कोटी मंजूर

सांगोला : सांगोला तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था बिकट झाली होती. यासाठी प्रस्तावित केलेल्या तीन रस्त्यांच्या कामांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक ३ अंतर्गत २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

सांगोला तालुक्यातील सोनलवाडी-अजनाळे ते बलवडी १३.७०० किलोमीटर रस्त्यासाठी ९ कोटी ५ लाख रुपये, महूद ते अचकदाणी ८.६०० किलेामीटर रस्त्यासाठी ५ कोटी ५२ लाख रुपये आणि यलमर मंगेवाडी ते बलवडी ७.१०० किलोमीटर रस्त्यासाठी ५ कोटी ११ लाख रुपये असा २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या रस्त्यांची कामे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेद्वारे निविदा प्रक्रिया करून सुरु केली जाणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

Web Title: 20 crore sanctioned for road works