जिल्ह्यातील ३३ कारखान्यांकडे २ लाख ९० हजार हेक्टर उसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:22 AM2021-09-25T04:22:49+5:302021-09-25T04:22:49+5:30

सोलापूर जिल्ह्यात गतवर्षी १३५ लाख मे. टन उसाचे गाळप झाले होते. चालूवर्षी १५५ लाख मे. टन गाळप होण्याची शक्यता ...

2 lakh 90 thousand hectares of sugarcane registered with 33 factories in the district | जिल्ह्यातील ३३ कारखान्यांकडे २ लाख ९० हजार हेक्टर उसाची नोंद

जिल्ह्यातील ३३ कारखान्यांकडे २ लाख ९० हजार हेक्टर उसाची नोंद

Next

सोलापूर जिल्ह्यात गतवर्षी १३५ लाख मे. टन उसाचे गाळप झाले होते. चालूवर्षी १५५ लाख मे. टन गाळप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालूवर्षी २० लाख मे. टन उसाचे गाळप वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय; मात्र अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात एकूण ४० कारखाने आहेत. त्यातील ३३ कारखान्यांनी साखर आयुक्तालयाकडे गाळपाची आकडेवारी नोंद केली आहे. यामध्ये कारखान्यांकडे आडसाली, पूर्वहंगामी, सुरू, खोडवा अशा ऊस पिकाची नोंद आहे. भीमा टाकळी (८.५० मे.टन), चंद्रभागा (६.६४ लाख मे. टन), पांडुरंग (१५ लाख मे.टन), सिद्धेश्वर (१४ लाख मे.टन), संत दामाजी (५.३१ लाख मे.टन), सहकार महर्षी (११ लाख मे.टन), श्री विठ्ठल (९.२५ लाख मे.टन), विठ्ठलराव शिंदे सहकारी (२० लाख मे.टन), विठ्ठलराव शिंदे युनिट (५ लाख मे.टन), श्री मकाई (३ लाख मे.टन), धर्मदास (२.७३ लाख मे.टन), लोकनेते (७.६५ लाख मे.टन), सासवड माळी (६ लाख मे.टन), लोकमंगल ॲग्रो (३ लाख मे.टन), लोकमंगल शुगर (९.६५ लाख मे.टन), विठ्ठल कार्पोरेशन (६.१८ लाख मे.टन), सिद्धेश्वर शुगर (६ लाख मे.टन), जकराया (५.७७ लाख मे.टन), इंद्रेश्वर (६.५० लाख मे.टन), भैरवनाथ शुगर (६ लाख मे.टन), भैरवनाथ (५.५० लाख मे.टन), युटोपीयन (५.४० लाख मे.टन), मातोश्री लक्ष्मी शुगर (४.३१ लाख मे.टन), आलेगाव भैरवनाथ (४ लाख मे.टन), जयहिंद शुगर (१० लाख मे.टन), विठ्ठल रिफायनरी (७ लाख मे.टन), गोकुळ माऊली (८ लाख मे.टन), ओंकार शुगर चांदापुरी (२.३ लाख मे.टन), शंकर सहकारी (२६३६ हेक्टरची नोंद), सीताराम महाराज शुगर (४६९२ हेक्टर) असे एकूण २१७ लाख मे. टनाची नोंद झाली आहे. १५ ऑक्टोबर २०२१ पासून साखर कारखाने चालू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.

........

अतिरिक्त ऊस गाळप सतावणार का?

चांगल्या पावसामुळे गतवर्षीपेक्षा यंदा उसाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली आहे. यंदाही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस सध्या जोमात आला आहे. त्यामुळे यंदा ऊस गाळप वाढणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत २० लाख मे.टन उसाचे गाळप वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. उसाचे गाळप वाढले, तर अतिरिक्त ऊस गाळप शेतकऱ्यांना सतावणार आहे.

Web Title: 2 lakh 90 thousand hectares of sugarcane registered with 33 factories in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app