शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

माघी एकादशीसाठी सोलापूर जिल्ह्यातील नऊ डेपोतून धावणार १५८ बस

By appasaheb.patil | Updated: February 7, 2019 13:24 IST

सोलापूर : माघ एकादशीनिमित्त पंढरपुरात होणाºया गर्दीचे नियोजन पाहता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूरसह पंढरपूर , बार्शी, अक्कलकोट, करमाळा, ...

ठळक मुद्देपंढरपुरात होणाºया माघवारीसाठी सोलापूर विभागातील नऊ डेपोतून गाड्या सोडण्याचे नियोजनसोलापूरसह पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, करमाळा, अकलूज, मंगळवेढा, कुर्डूवाडी, सांगोला अशा नऊ डेपोतून १५८ गाड्या धावणार

सोलापूर : माघ एकादशीनिमित्त पंढरपुरात होणाºया गर्दीचे नियोजन पाहता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूरसहपंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, करमाळा, अकलूज, मंगळवेढा, कुर्डूवाडी, सांगोला अशा नऊ डेपोतून १५८ गाड्या धावणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली.

बोलावा विठ्ठल..पाहावा विठ्ठल..क़रावा विठ्ठल...स्वभावे.. या संत वचनाप्रमाणे वारकरी भाविक टाळ-मृदुंगाच्या तालामध्ये विठुरायाचा गजर करत माघ महिन्यातील भागवत शुद्ध एकादशी या माघवारीच्या सोहळ्यासाठी विविध राज्यांमधून चार लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी येतात़ या वारकºयांच्या सेवेसाठी परिवहन विभागाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत़ भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष व ज्यादा गाड्यांचे नियोजन करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले़ 

उत्पन्न वाढीसाठी विभाग नियंत्रकांचा कानमंत्र- आषाढी एकादशी वारी, कार्तिकी एकादशी वारी, माघ एकादशी वारी व चैत्र एकादशी वारी या चार महत्त्वाच्या वाºयांचा उत्सव पंढरपुरात होतो़ या उत्सवासाठी राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात़ या भाविकांची गैरसोय होऊ नये, भाविकांच्या काय अपेक्षा आहेत, भाविकांना महामंडळाकडून काय सहकार्य हवे आहे, खासगी वाहतुकीवर मात करून एसटीचे अधिक उत्पन्न कसे वाढवावे, याबाबत विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी वारीत काम करणारे कर्मचारी, अधिकाºयांना चांगलाच कानमंत्र दिला़

या विभागातून सुटणार गाड्या़- पंढरपुरात होणाºया माघवारीसाठी सोलापूर विभागातील नऊ डेपोतून गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ यात सोलापूर डेपोतून २४, पंढरपूर १३, बार्शी ३४, अक्कलकोट १०, करमाळा १४, अकलूज १५, मंगळवेढा १४, कुर्डूवाडी १३, सांगोला २१ अशा १५८ बसेसची सोय परिवहन महामंडळाकडून करण्यात येणार आहे़ याशिवाय गरज पडल्यास जादा व विशेष गाड्यांचेही नियोजन करण्यात आल्याचे परिवहन विभागाने सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरST Strikeएसटी संप