सोलापुरात १५०० किलो चंदन जप्त
By Appasaheb.dilip.patil | Updated: July 29, 2017 14:14 IST2017-07-29T14:11:32+5:302017-07-29T14:14:47+5:30
मोहोळ दि २९ : मोहोळ तालुक्यातील वाफळे गावात पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या विशेष पथकाने छापा टाकून ४२ लाख १० हजार रुपयांचे १५०० किलो चंदन जप्त केल्याची घटना घडली.

सोलापुरात १५०० किलो चंदन जप्त
आॅनलाइन लोकमत सोलापूर
मोहोळ दि २९ : मोहोळ तालुक्यातील वाफळे गावात पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या विशेष पथकाने छापा टाकून ४२ लाख १० हजार रुपयांचे १५०० किलो चंदन जप्त केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून वाफळे गावाच्या शिवारात राहणाºया श्रीकृष्ण उर्फ बिनू बळीराम दाढे हा त्याच्या शेतातील राहत्या घरी व घराच्या पाठीमागील बाजूस चोरीच्या चंदनाची तोडलेली लाकडे याचा एकत्रित साठा करून परजिल्ह्यात विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यावरून विशेष पथकातील परीवेक्षाधिन संदीप मेटके, सपोनि संदीप धांडे, सपोनि गणेश निंबाळकर, पोहेकॉ मनोहर माने, पोलीस नाईक अमृत खेडकर, पोलीस कॉ़ प्रवीण पाटील, अमोल जाधव, दिनेश राठोड, अमोल माने, बाळराजे घाडगे, सुरेश लामजने, पांडुरंग केंद्रे, महादेव लोंढे, बालाजी नागरगोजे, सोमनाथ बोराटे, विलास पारधी, अक्षय दळवी, सिद्धाराम स्वामी आदींच्या पथकाने २८ जुलै रोजी सकाळी १० वा़च्या दरम्यान छापा टाकला असता बिनू दाढे याने पांढºया रंगाच्या गोण्यात घरातील एका खोलीमध्ये व घराच्या पाठीमागील बाजूस सुगंधित चंदनाची लाकडे ठेवली असल्याचे आढळून आले़ चंदनाच्या गोण्याचे वजन केले असता १५८० किलो इतके वजन भरले़ त्याची किंमत ४२ लाख १० हजार रुपये इतकी असल्याचे सपोनि संदीप धांडे यांनी सांगितले. या प्रकरणी दाढे याच्यावर मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.