काळ्या बाजारात जाणारा १५ लाखांचा तांदूळ पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:23 IST2021-07-29T04:23:57+5:302021-07-29T04:23:57+5:30
अधिक माहिती अशी की, शिवकुमार शंकर राठोड (रा.गुलबर्गा), राहुल सुभाष जाधव (रा.सिटीफार्म तांडा आळंद) या दोघांनी मिळून मालट्रकमधून वेगवेगळ्या ...

काळ्या बाजारात जाणारा १५ लाखांचा तांदूळ पकडला
अधिक माहिती अशी की, शिवकुमार शंकर राठोड (रा.गुलबर्गा), राहुल सुभाष जाधव (रा.सिटीफार्म तांडा आळंद) या दोघांनी मिळून मालट्रकमधून वेगवेगळ्या खतांच्या खुल्या बॅगेत ५० ते ६० किलो वजनाचे तांदूळ भरून जात होते. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलिसांनी साफळा रचून कारवाई केली. ही कारवाई दुधनी ते अक्कलकोट कडे जात असताना, संगोगी गावाजवळ करण्यात आली. त्यामधून १० लाख रुपये किमतीचे अशोक लेलँड ट्रक, ४ लाख ५८ हजार ७०० रुपयांचे २२ हजार ९३५ किलो तांदूळ, ४१७ कट्टे तांदूळ असा एकूण १४ लाख ५८ हजार ७०० रुपयांचे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तुकाराम राठोड, पोलीस उपनिरीक्षक सी.बी. बेरड, पो.हेकॉ अजय भोसले, संजय जाधव, पोलीस सुरेश लामकाने आदींनी केली.