ग्रामीण मार्गांच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:21 IST2021-05-16T04:21:17+5:302021-05-16T04:21:17+5:30

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शखाली आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधी मंजूर ...

1.5 crore sanctioned for repair of rural roads | ग्रामीण मार्गांच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर

ग्रामीण मार्गांच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शखाली आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. तालुक्याच्या विकासासाठी निधीची अनेकवेळा मागणी करण्यात येत होती. याबाबत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील विविध विकासकामांना यावेळी पुन्हा झुकते माप मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळणार आहे.

या मार्गांची होणार दुरुस्ती

गिरवी ते भांबुर्डी (२० लाख), चांदापुरी कुसमोड मळोली ( १० लाख), तिरवंडी रेडणी जिल्हा हद्द (१४ लाख), कन्हेर ते गिरवी रस्ता ते आठ नंबर चौकी (१४ लाख), सदाशिवनगर करेवस्ती गोरेवस्ती (१४ लाख रुपये), तिरवंडी ते वाघमोडेवस्ती (१४ लाख), फोंडशिरस कोडलकरवस्ती ते रुपनवरवस्ती कदमवाडी (१४ लाख), मोटेवाडी बालाजीनगर ते खरातवस्ती (१४ लाख), बाभूळगाव ते माधवमळा (१४ लाख), कण्हेर गिरवी रस्ता ते कण्हेर चौकी बापूराव लोटे ते कण्हेर चौकी (१४ लाख) असा विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राम सातपुते यांनी दिली.

Web Title: 1.5 crore sanctioned for repair of rural roads