उत्तर सोलापूर तालुक्यातील १४ गावांना मिळाली सदस्यपदाची संधी
By Admin | Updated: January 25, 2017 18:13 IST2017-01-25T18:13:10+5:302017-01-25T18:13:10+5:30
उत्तर सोलापूर तालुक्यातील १४ गावांना मिळाली सदस्यपदाची संधी

उत्तर सोलापूर तालुक्यातील १४ गावांना मिळाली सदस्यपदाची संधी
उत्तर सोलापूर तालुक्यातील १४ गावांना मिळाली सदस्यपदाची संधी
सोलापूर आॅनलाईन लोकमत -
नेतेमंडळींची मर्जी संपादन करण्यासाठी यशस्वी झालेल्यांनाच आजवर उमेदवारी मिळाली असून, उत्तर तालुक्यातील १४ गावांना जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य होण्याची संधी मिळाली आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील १० गावे सोलापूर शहरात सामावल्यानंतर अवघी ४० गावे व ३६ ग्रामपंचायती तालुक्यात राहिल्या आहेत. दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती मतदारसंघ असलेल्या तालुक्यावर आजवर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. शिवसेना-भाजपाचे केंद्रात व राज्यात सरकार असले तरी जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदार काँग्रेसचे उमेदवार विजयी करतात. त्याला कारणही साजेसे आहे. सेना-भाजपाचे नेते पाच वर्षे नागरिकांच्या संपर्कात नसतात व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत युतीचा निर्णय अगदी शेवटच्या काही मिनिटाला होतो. काही ठिकाणी युतीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता असते परंतु प्रचारात असलेलेच घोळ घालतात. असा आजवरचा अनुभव असल्याने काँग्रेस-राकाँने दिलेले त्याच-त्या गावचे उमेदवार विजयी झालेले आहेत. नान्नजच्या नागनाथ विभुते, सीताबाई अनिल गवळी, सुनंदा लक्ष्मण कोरे, यशोदा घोडके, प्रवीण भालशंकर, तिऱ्हेचे हरिभाऊ जाधव, दिलीप माने, भीमराव आदटराव, कवठ्याचे रुक्मिणी केंगार, महादेव पाटील, डोणगावच्या प्रमिला गायकवाड, शारदा आवताडे, बेलाटीचे जगन्नाथ पाटील, विजया पाटील, पाकणीचे सुभाष शिंदे, कोंडीचे घनशाम भोसले, गुळवंचीचे संभाजी इंगळे, विठ्ठल बोराडे, अकोलेकाटीचे शिवाजी क्षीरसागर, शंकर क्षीरसागर, रंजना धनंजय लामकाने, कौठाळीचे हणमंत निचळ, रामभाऊ माने, शामराव माने, उद्धव साबळे, वडाळ्याचे बळीराम साठे, पांडुरंग पवार, बाणेगावचे बाबुराव ढोणे, भारती ढोणे व ब पांडुरंग चवरे, मार्डीचे किसनराव पाटील, बाळासाहेब किसनराव पाटील, इंद्रजित पवार, ज्योती अविनाश मार्तंडे व सुरेखा बाबासाहेब पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
----------------------------
पक्षाने दिले; मात्र गावाने हुकवले
बीबीदारफळ जिल्हा परिषद गटातील सर्वाधिक लोकसंख्या बीबीदारफळ गावाची आहे. या गावच्या शिवाजी ननवरे यांना शिवसेनेने जि.प. ची उमेदवारी दिली होती. पक्षातीलच काहींनी व गावातील काहींनी विरोध केल्याने ननवरे पराभूत झाले होते. विलास साठे यांना पं.स.ची उमेदवारी दिल्यानंतरही साठे यांच्या गाडीत फिरणाऱ्यांनीच विरोधात मतदान केल्याने साठे यांचा पराभव झाला होता. पक्षाने दिले तरी गावातूनच विरोध झाल्याने गावातील सदस्य विजयी झाला नाही.