शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुका शांततेत, भयमुक्त होण्यासाठी १३४ जणांना पंढरपूर तालुक्यातून हद्दपार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 11:12 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यामध्यील ७१ गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लोकशाही मार्गाने, शांततेने व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरीता गुन्हेगार वृत्तीच्या १३४ जणांना १४ जानेवारी ते १९ जानेवारीपर्यंत हद्दपार करण्यात आले आहे.

पंढरपूर शहर पोलिस ठाणे अंतर्गत १०७ कलम नुसार ५८ जणांकडून चांगल्या तुमचे वर्तणुकीचे बाँड घेण्यात आले आहेत. ११० कलम नुसार ३ जणांवर व महाराष्ट्र प्रोव्हीशन कलम ९३ प्रमाणे ३३ जणांवर कारवाई केली.

पंढरपूर तालुका पोलिस ठाणे अंतर्गत १०७ कलम नुसार ८० जणांवर, ११० कलम नुसार ३४ जणांवर, १४४(२) कलम नुसार ६२ जणांवर, १४९ कलम नुसार ४२९ जणांवर व महाराष्ट्र प्रोव्हीशन कलम ९३ प्रमाणे १७ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली.

पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाणे अंतर्गत १०७ कलम नुसार २५ जणांवर, ११० कलम नुसार १३ जणांवर, १४४(२) कलम नुसार ३२ जणांवर, १४९ कलम नुसार ३६६ जणांवर व महाराष्ट्र प्रोव्हीशन कलम ९३ प्रमाणे १५ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली.

करकंब पोलिस ठाणे अंतर्गत १०७ कलम नुसार ५८ जणांवर, ११० कलम नुसार ७ जणांवर, १४४(२) कलम नुसार ४० जणांवर, १४९ कलम नुसार १२८ जणांवर  प्रतिबंधक कारवाई केली. 

ही कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक अरुण पवार, पोलीस निरीक्षक किरणअवचर, पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी केलेली आहे.

◼️ ६ वाळू माफिया हद्दपार

पंढरपूर शहर पोलीस ठाणे हददीतील वाळूविषयक वारंवार गुन्हे केलेले पंढरपूर शहरातील ४ व ग्रामीण भागातील १ अशा एकूण ६ जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(अ)(ब) प्रमाणे हद्दपारीची  कारवाई केली आहे. यामध्ये सुरज विष्णू पवार (रा. जुनी वडार गल्ली, पंढरपूर), महादेव बाळू काळे (रा. जुनी वडार गल्ली,पंढरपूर), राजू उर्फ रामा तिम्मा बंदपटटे (रा. संतपेठ , पंढरपूर), लहू बाबू चव्हाण (रा. ज्ञानेश्वर नगर झोपडपटटी, पंढरपूर), नागेश शिवाजी घोडके (रा.बोहाळी, ता.पंढरपूर), ऋतिक उर्फ दादा अरुण लामकाने (रा. पिराची कुरोली, ता.पंढरपूर) यांचा सहभाग आहे.

 ◼️ पंढरपूर उपविभागात एवढी कारवाई

पंढरपूर पोलिस उपविभागात १०७ कलम नुसार ३२८ जणांवर, ११० कलम नुसार १६७ जणांवर, १४४(२) कलम नुसार १३४ जणांवर, १४९ कलम नुसार १०७२ जणांवर व महाराष्ट्र प्रोव्हीशन कलम ९३ प्रमाणे ६५ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली. आगामी निवडणुक शांततेने, भयमुक्त वातावरणात पार-पाडण्याकरीता वरील प्रमाणे प्रतिबंधक कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरCrime Newsगुन्हेगारीElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत