उसाची टोळीसाठी १३ लाखाला गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:20 IST2021-02-08T04:20:17+5:302021-02-08T04:20:17+5:30

शेट्येप्पा शेट्येपगोळ रा. शंख ता. जत जि. सांगली, श्रीचंद मुचंडी रा. कोळगिरी ता. जत जि सांगली, निंगप्पा पुजारी रा. ...

13 lakhs wasted for sugarcane | उसाची टोळीसाठी १३ लाखाला गंडविले

उसाची टोळीसाठी १३ लाखाला गंडविले

शेट्येप्पा शेट्येपगोळ रा. शंख ता. जत जि. सांगली, श्रीचंद मुचंडी रा. कोळगिरी ता. जत जि सांगली, निंगप्पा पुजारी रा. भतगुंणकी ता. इंडी जि. विजापूर, बिरबल काळे रा शेड्याल ता. जत. जि सांगली, शिवप्पा ई पुजारी रा. अईरसंग ता. इंडी जि. विजापूर, मडप्पा हवगोंडे रा. शेंड्याळ ता. जत जि सांगली, सुरेश हवागोंडी रा शेंड्याळ ता जत जि सांगली, अक्षय पाटील रा वळसंग ता. जत जि सांगली, निंगप्पा हातळ्ळी या नऊ जणांनी मिळून संगनमत करून फिर्यादी निजलिंग रेणुका कांबळे रा. कल्लकर्जाळ यांना फसविले आहे. ऊस तोडणीचे टोळी करून देतो म्हणून १३ लाख रुपये घेतले होते. कालांतराने टोळी दिली नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता, शिवीगाळ, दमदाटी, करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोंद केला आहे.

Web Title: 13 lakhs wasted for sugarcane