शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

११ लाखांचे उत्पन्न अपेक्षित; ५६ टन कांद्याच्या साठवणूकीसाठी १०० फुटांची उभारली चाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 16:03 IST

शेटफळच्या तरुण शेतकºयाची किमया; लॉकडाऊनमधील वेळेचा केला सदुपयोग

ठळक मुद्देकेळीमधील कांद्याचे आंतरपिकाचा प्रयोग या परिसरातील शेतकºयांना मार्गदर्शक२५ टन कांदा चाळीच्या माध्यमातून साठवणुकीचा निर्णयस्वत:च्या शेतात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून १०० फुटाची कांदा चाळीची उभारणी

करमाळा : तालुक्यातील शेटफळ येथील तरुण शेतकरी ज्ञानेश्वर पोपट पाटील यांनी आपल्या शेतातील केळीच्या सव्वादोन एकर क्षेत्रामध्ये घेतलेल्या कांद्याच्या आंतरपिकापासून ५६ टन कांद्याचे उत्पादन घेतले आहे़ यापासून ११ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे़ सध्या लॉकडाऊनमधील वेळेचा सदुपयोग केला़ शिवाय आता कांदा विक्री केला तर अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतातील उपलब्ध साहित्यापासून कांदा चाळीची उभारणी करून तो साठवणूक करून ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी पदविकेचे शिक्षण झालेल्या ज्ञानेश्वरने शिक्षणानंतर नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतला़ गावात कृषी सेवा केंद्र सुरू केले़ २०१३ पासून शेतीमध्ये मिळालेल्या अनुभवातून वेगवेगळी पिके घेत त्यामधून विक्रमी उत्पादन मिळवलेले आहे़ सध्या त्यांनी आपल्या सव्वादोन एकर क्षेत्रावर केळीचे पीक घेतले आहे़ केळी लागवड करण्यापूर्वी पूर्व मशागतीनंतर फेक पद्धतीने कांद्याची लागवड केली़ ठिबक संचाच्या साह्याने पाणी व्यवस्थापन केले़ लागवडीनंतर एक महिन्याने रासायनिक खताचा भेसळ डोस दिला़ वेळेवर खुरपणी करून कांद्याचे जोमदार पीक आणले़ यासाठी त्यांना ७३ हजार रुपये खर्च आला.

 त्यांचा केळीमधील कांद्याचे आंतरपिकाचा प्रयोग या परिसरातील शेतकºयांना मार्गदर्शक ठरत असून अनेक शेतकरी त्यांच्याकडे येऊन यासंबंधी माहिती घेत आहेत.

कांद्यासाठी १०० फुटांची उभारली चाळ- त्या क्षेत्रांमधून ५६ टन कांद्याचे उत्पादन मिळाले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने २५ टन कांदा चाळीच्या माध्यमातून साठवणुकीचा निर्णय घेतला़ स्वत:च्या शेतात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून १०० फुटाची कांदा चाळीची उभारणी केली आहे़ त्यांना या कांद्यापासून २० रुपये किलो दर अपेक्षित असून असा दर मिळाल्यास या आंतर पिकातून त्यांना ११ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे़ 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याagricultureशेतीonionकांदाFarmerशेतकरी