शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

दहावी परीक्षेत सोलापूरचा टक्का 10.84 टक्क्यांनी घसरला

By appasaheb.patil | Updated: June 8, 2019 14:42 IST

सर्वात कमी निकाल अक्कलकोट तालुक्याचा; जिल्ह्यातील ५२ हजार ५९६ विद्यार्थी उत्तीर्ण

ठळक मुद्देमार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी १ वाजता जाहीर झालासोलापूर जिल्ह्याचा एकूण ८१.४३ टक्के निकाल लागला असून गतवषीर्पेक्षा यंदा दहावीच्या निकालात ९ टक्क्यांची घसरण झाली

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी १ वाजता जाहीर झाला. सोलापूर जिल्ह्याचा एकूण ८१.४३ टक्के निकाल लागला असून गतवषीर्पेक्षा यंदा दहावीच्या निकालात 10.84 टक्क्यांची घसरण झाली आहे.  यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. 

इयत्ता दहावीसाठी सोलापूर जिल्ह्यातून एकूण ६४ हजार ५९४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५२ हजार ५९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ३५ हजार ६२५ मुलांपैकी २७ हजार ८२ मुले उत्तीर्ण झाली. मुलांची टक्केवारी ७६.०२ टक्के आहे. जिल्ह्यातून २८ हजार ९६९ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी २५ हजार ५१४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ८८.०७ टक्के असून मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी अधिक आहे.------तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणे

  • - अक्कलकोट : ७३.०९ टक्के
  • - बार्शी : ८५.५१ टक्के
  • - करमाळा : ७८.०६ टक्के
  • - माढा : ८४.१५ टक्के
  • - माळशिरस : ७८.९१ टक्के
  • - मंगळवेढा : ८४.५१ टक्के
  • - मोहोळ : ८६.४५ टक्के
  • - पंढरपूर : ८१.५२ टक्के
  • - सोलापूर शहर : ८१.७३ टक्के
  • - सांगोला - ८४.७९ टक्के
  • - एकूण निकाल - ८१.८३ टक्के
टॅग्स :SolapurसोलापूरSSC Resultदहावीचा निकालEducationशिक्षणSchoolशाळा