१0४ मतदान केंद्रे संवेदनशील
By Admin | Updated: October 22, 2015 21:11 IST2015-10-22T21:11:09+5:302015-10-22T21:11:09+5:30
जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि २0 पोटनिवडणुकीसाठी १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

१0४ मतदान केंद्रे संवेदनशील
सोलापूर: जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि २0 पोटनिवडणुकीसाठी १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी १९ हजार ५५७ उमेदवारी अर्ज आले आहेत. मतदानासाठी २0१८ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून, यातील १0४ मतदान केंद्रे संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत.
११ लाख १५ हजार मतदार असून, यातून ५0४0 सदस्य निवडून दिले जाणार आहेत. निवडणुकीच्या कामासाठी साडेचार हजार पोलीस कर्मचारी आणि १५ हजार अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. (प्रतिनिधी)