शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

हिंदी भाषिक आलिशाने मिळवले संस्कृतमध्ये १०० गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 14:09 IST

इच्छाशक्तीचा विजय: माय मराठी भाषेतही गुणांची नव्वदी पार

ठळक मुद्देहिंदी मातृभाषिक असलेल्या आलिशा मकानदार या विद्यार्थिनीने संस्कृत विषयामध्ये १०० पैकी १०० गुणविजापूर रोड परिसरातल्या निर्मलाताई ठोकळ प्रशालेमध्ये शिकणाºया आलिशा अन्वरशा मकानदार हिचं सर्व शिक्षण तसं मराठी  माध्यमातूनच

विलास जळकोटकर सोलापूर: भाषेवर प्रेम करणं.. तिचा अभ्यास करणं.. प्रभुत्व मिळवणं मग तो कोणताही भाषिक असो. इच्छाशक्ती असली की सर्वकाही साध्य होतं. याची प्रचिती हिंदी मातृभाषिक असलेल्या आलिशा मकानदार या विद्यार्थिनीने संस्कृत विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून पांडित्यांचे भूषण समजल्या जाणाºया भाषेत प्रभूत्व मिळवलं आहे. 

विजापूर रोड परिसरातल्या निर्मलाताई ठोकळ प्रशालेमध्ये शिकणाºया आलिशा अन्वरशा मकानदार हिचं सर्व शिक्षण तसं मराठी  माध्यमातूनच झालेलं असलं तरी घरी मातृभाषा मात्र हिंदी असायची; मात्र लहानपणापासून ती कोणताही अभ्यास असो मनापासून करायचा ही तिची प्राथमिक शिक्षणापासूनची ख्याती. वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. नोकरीच्या निमित्तानं या गावाहून त्या गावी वडिलांची बदली हे ठरलेलं. इयत्ता पहिली ते चौथी वडील तडवळच्या शाळेत असल्याने तिथच शिक्षण झालं. 

पुढे बदलीचा त्रास मुलांच्या शिक्षणात अडसर नको म्हणून वडील अन्वरशा यांनी तिला तिच्या मावशीकडं मंद्रुपला महात्मा बसवेश्वर हायस्कूलला पाठवलं. तेथेच ५ वी ते ८ वीपर्यंत शिक्षण झालं. पुढे सोलापूरला स्थाथिक झाल्यानं निर्मलाताई ठोकळ प्रशालेमध्ये ९ वीमध्ये तिचा प्रवेश झाला. येथे तिला संस्कृत विषय असल्याचं समजलं. या विषयातही पारंगत होऊन अशी जिद्द बाळगून तिनं हा विषय निवडला आणि पैकीच्या पैकी १०० गुण मिळवून तिने हे यश प्राप्त केले. 

या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा निर्मलाताई ठोकळ, उपाध्यक्ष सचिन ठोकळ, शिल्पा ठोकळ, सचिव भिकाजी गाजरे, प्राचार्य दत्तात्रय गाजरे, आशा भोसले यांनी कौतुक करीत तिला शुभेच्छा दिल्या.

आई-वडील अन् गुरुजनांचं मार्गदर्शन- आलिशानं केवळ संस्कृत विषयावरच लक्ष केंद्रित न करता मराठी विषयामध्येही ९० गुण मिळवले आहेत. अन्य विषयातही ९५ च्या पुढे मजल मारली आहे. शेकडा ९६.२० टक्के गुण मिळवत तिनं यशाला गवसणी घातली आहे. या यशाचं गमक सांगताना ती म्हणाली, शाळेच्या व्यतिरिक्त दररोज पाच तास प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा याचे नियोजन आखले. माझी मोठी बहीण अंजूम जी याचवर्षी बारावीला होती. तिचंही सहकार्य घेतलं. आई रेश्मा आणि शाळेचे प्राचार्य दत्तात्रय गाजरे, संस्कृत विषयाच्या शिक्षिका स्वप्नजा जाधव, युसूफ शेख, आशा भोसले, जकवडकर सर यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच मी हे यश संपादन करु शकल्याचे तिने विनयपूर्वक सांगितले. भावी वाटचालीबद्दल सांगताना तिनं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन समाजातील गोरगरिबांना ही सेवा कशी मिळेल यासाठी प्रयत्नशील राहू असं ती म्हणाली. 

इयत्ता ९ वीमध्ये निर्मलाताई ठोकळ शाळेत प्रवेश घेतला. नंतर कळाले की संस्कृत विषय आहे. पण मी घाबरले नाही. माझी मैत्रीण अंजलीच्या मदतीने संस्कृत विषयाची ओळख करून घेतली. नेहमी वाचन, लेखन, उच्चार सुधारण्याचा प्रयत्न केला. हळूहळू संस्कृतमध्ये आवड निर्माण झाली. अभ्यास करताना कंटाळा आला की, संस्कृतमधील श्लोक म्हणणे, वाचन करणे असा अभ्यास केला. खरंच या भाषेमुळं माझे स्पष्ट उच्चार करण्याची सवय जडली.- आलिशा मकानदार

मुस्लीम समाजातील मुलींचा शिक्षण क्षेत्रामध्ये टक्का वाढायला हवा. उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. पालकांनी तिचा कल पाहून तिला शिक्षणासाठी उद्युक्त करावे. माझ्या मुलीनं मातृभाषा हिंदी असूनही तिनं अवघड वाटणाºया संस्कृत विषयामध्ये मिळवलेल्या यशाबद्दल आम्हा कुटुंबीयांना अभिमान आहे.- - अन्वरशा मकानदार,  पिता

टॅग्स :SolapurसोलापूरSSC Resultदहावीचा निकालmarathiमराठीEducationशिक्षणSchoolशाळा