चोरट्याकडून १० मोटारसायकली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:23 IST2021-01-03T04:23:10+5:302021-01-03T04:23:10+5:30

गट नं. २ महाळुंग (ता. माळशिरस) येथील नवनाथ बलभीम नाईकनवरे हा चोरीच्या मोटारसायकल विक्री करत असल्याची खबर पोलिसांना मिळताच ...

10 motorcycles seized from thieves | चोरट्याकडून १० मोटारसायकली जप्त

चोरट्याकडून १० मोटारसायकली जप्त

गट नं. २ महाळुंग (ता. माळशिरस) येथील नवनाथ बलभीम नाईकनवरे हा चोरीच्या मोटारसायकल विक्री करत असल्याची खबर पोलिसांना मिळताच त्यास ताब्यात घेऊन अटक केली. अधिक तपास केला असता त्याच्याकडून १० चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. त्याने अकलूज, पुणे, हडपसर व इतर ठिकाणाहून या मोटारसायकली चोरल्याचे निष्पन्न झाले. संशयित आरोपीची पोलीस कोठडी घेण्यात आली असून त्याच्याकडून आणखी मोटारसायकली चोरल्याचे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार जमीर शेख, अभिजित कुंभार, ज्ञानेश्वर सरडे, शिवाजी जाधव, विशाल घाटगे, नीलेश काशिद, शिवाजी पांढरे, अमितकुमार यादव, मनोज शिंदे, बबन साळुंखे, प्रवीण हिंगणगावकर यांनी केली आहे. पुढील तपास ज्ञानेश्वर सरडे करत आहेत.

Web Title: 10 motorcycles seized from thieves