विठ्ठलाच्या हुंडीत १० लाखांचे दान

By Admin | Updated: June 26, 2014 01:06 IST2014-06-26T01:06:12+5:302014-06-26T01:06:12+5:30

अज्ञात भक्त

10 lakhs of donations in Vitthal dowry | विठ्ठलाच्या हुंडीत १० लाखांचे दान

विठ्ठलाच्या हुंडीत १० लाखांचे दान


पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील हुंडीमध्ये १0 लाख ४२ हजार रुपयांचे निनावी पाकीट एका भक्ताने टाकल्याचे सापडले असून, प्रत्येकी दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाच अंगठ्याही आढळून आल्या आहेत.
आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज यांचे तर देहूहून संत तुकाराम महाराजांसह महाराष्ट्रातून इतर संतांच्या पालख्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या भेटीला आषाढी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. असे असताना मंदिर समितीच्या वतीने स्वच्छता, साफसफाई करण्याचे काम सुरू आहे. तर प्रत्येक आठवड्यात दानपेटी व हुंडीचीही मोजदाद करण्यात येत आहे. ही मोजदाद बुधवारी सुरू असताना रक्कम व सोन्याच्या अंगठ्या सापडल्या. शासनाने मंदिर ताब्यात घेतल्यापासून विविध वस्तू, देणग्या, रोख देणग्या व हुंडीत गुप्तदानात वाढ होत असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली व व्यवस्थापक एस. एस. विभुते यांनी सांगितले.

Web Title: 10 lakhs of donations in Vitthal dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.