सोलापुरात १० इंडियन स्टार कासव जप्त; वनविभागाची  मोठी कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 01:17 PM2021-05-20T13:17:13+5:302021-05-20T13:17:19+5:30

फिश टँक दुकानात होती पिल्लं

10 Indian star turtles seized in Solapur; Major action of forest department | सोलापुरात १० इंडियन स्टार कासव जप्त; वनविभागाची  मोठी कारवाई 

सोलापुरात १० इंडियन स्टार कासव जप्त; वनविभागाची  मोठी कारवाई 

googlenewsNext

सोलापूर : आसरा चौक येथील एका फिश टँक दुकानात ठेवण्यात आलेले १० इंडियन स्टार कासव जप्त करण्यात आले. ही कारवाई वन विभागातर्फे करण्यात आली.

इंडियन स्टार कासवाची प्रजाती ही शेड्यूल चारमध्ये येते. हे कासव दुर्मीळ समजले जाते. हे कासव दिसायला आकर्षक असते. भारत आणि श्रीलंकेच्या “ड्राय झोन” मधील प्रदेशात हे कासव आढळून येतात. भारतात आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील खेड्यांजवळील वनक्षेत्रात इंडियन स्टार कासव आढळतात. महाराष्ट्रातील पश्चिम घाटातही या प्रकारचे कासव आढळतात.

अवैधरित्या स्टार कासव बाळगल्याबद्दल वन विभागाला माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी फिश टँक दुकानावर धाड टाकली असता. स्टार असलेली कासवाची १० पिल्लं आढळून आली. या कासवांना वनविभागाने ताब्यात घेतले असून, याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कासव शेड्यूल चारमध्ये येत असून कासव बाळगल्यास गुन्ह्याचे स्वरुप पाहून सहा महिने ते दोन वर्ष किंवा आर्थिक दंड करता येत असल्याचे मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा यांनी सांगितले.

Web Title: 10 Indian star turtles seized in Solapur; Major action of forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.