१ ब्रास वाळू, ट्रॉलीसह ४ लाखाचा ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:23 IST2021-05-13T04:23:00+5:302021-05-13T04:23:00+5:30

उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक नाळे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित पिसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हजरत पठाण, ...

1 brass sand, 4 lakh tractor with trolley seized | १ ब्रास वाळू, ट्रॉलीसह ४ लाखाचा ट्रॅक्टर जप्त

१ ब्रास वाळू, ट्रॉलीसह ४ लाखाचा ट्रॅक्टर जप्त

उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक नाळे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित पिसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हजरत पठाण, पोलीस नाईक क्षीरसागर हे खासगी वाहनाने महूद येथे पॅट्रोलिंग करीत होते. यावेळी एक ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये चोरून वाळू भरून चिकमहूदला जात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी शिवाजी कॉलेजसमोर संशयावरून चालकास इशारा करून ट्रॅक्टर थांबवला. पोलिसांनी ट्रॅक्टरमधील राहुल अंकुश जाधव व दादा विठ्ठल चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत ३ लाख रुपयांचा ट्रॅक्टर, १ लाखाची डंपिंग ट्रॉलीसह ८ हजार रुपयांची अर्धा ब्रास वाळू असा सुमारे ४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुमित पिसे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी राहुल अंकुश जाधव व दादा विठ्ठल चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 1 brass sand, 4 lakh tractor with trolley seized