शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

नादच खुळा! 'झोमेटो'च्या डिलिव्हरी बॉयचा भर रस्त्यात भन्नाट डान्स, पाहा Viral Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 13:39 IST

सोशल मीडियावर अनेकदा डिलिव्हरी बॉयशी संबंधित काही व्हिडीओ व्हायरल होत असताना आपण पाहिले असतील.

सोशल मीडियावर अनेकदा डिलिव्हरी बॉयशी संबंधित काही व्हिडीओ व्हायरल होत असताना आपण पाहिले असतील. पण आता समोर आलेला व्हिडीओ पाहून लोक खूप मजा घेत आहेत आणि काहीजण नाराजही आहेत. झोमेटोचा एक डिलिव्हरी बॉय फूड डिलिव्हरी करण्याऐवजी भर रस्त्यात थांबतो आणि इन्स्टा रील बनवण्यासाठी नाचू लागतो. आता ही व्हायरल क्लिप पाहिल्यानंतर लोक म्हणू लागलेत की डिलिव्हरी उशीरा येण्याची ही कारणं आहेत तर. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये झोमेटोच्या गणवेशातील डिलिव्हरी बॉय रस्त्यात नाचताना पाहू शकता. व्हिडिओतील डिलिव्हरी बॉयच्या डान्स मूव्ह्स पाहण्यासारख्या आहेत. मात्र, त्याची रील बनवण्याची ही पद्धत काहींना पसंत न पडल्यानं अनेकांनी टीकाही केली आहे. आता हा व्हिडिओ शेअर करून लोक झोमेटोच्या ऑर्डर उशिरा का पोहोचतात याची कारणं समोर येऊ लागली आहेत, अशा प्रतिक्रिया देत आहेत. व्हायरल क्लिपमध्ये दिसतं की, डिलिव्हरी बॉय स्कूटीवरून उतरतो, नंतर अचानक डान्स करू लागतो. आता या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत. 

लोकांना वाटेल की डिलिव्हरी बॉय ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे उशीर होत असावा. पण इथे काहीतरी वेगळंच चाललंय, असं एका यूझरनं म्हटलं आहे. ही ३१ सेकंदांची क्लिप पाहताच ट्विटरवर व्हायरल झाली आहे. काहींना हा व्हिडिओ खूपच मजेशीर वाटला, तर काही युझर्सनं या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. ग्राहकानं ऑर्डर केलेलं जेवण थंड होत आहे आणि हा माणूस नाचण्यात व्यस्त आहे, असं एका यूझरनं म्हटलं आहे. तर त्याचवेळी दुसऱ्या एका युझरनं डिलिव्हरी बॉयच्या प्रतिभेचं कौतुक केलं आहे. तर एकानं आता डिलिव्हरी बॉयला टीप देणं बंद करणार असल्याचं जाहीर करुन टाकलं आहे. दरम्यान, व्हिडिओतील तरुण खरंच झोमेटोचा डिलिव्हरी बॉय आहे की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. कदाचित त्यानं डिलिव्हरी बॉयचा गणवेश फक्त रील बनवण्यासाठी परिधान केला असावा अशीही शक्यता आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलZomatoझोमॅटो