शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकुन सिंहाशी लढला झेब्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 18:27 IST

आपल्या मुलासाठी आई काय करू शकते, याचं उदाहरणच सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतून दिसून येत आहे. या व्हिडिओवर सध्या नेटिझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

आपल्या पिल्लावर हल्ला करणाऱ्या सिंहीणीच्या तावडीतून त्याला सोडवणाऱ्या झेब्र्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. आपल्या मुलासाठी आई काय करू शकते, याचं उदाहरणच सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतून दिसून येत आहे. या व्हिडिओवर सध्या नेटिझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

शिकारीच्या शोधात असलेल्या सिंहीणीनं झेब्र्याच्या पिल्लावर हल्ला केल्याचं या व्हिडिओत दिसतं. सिंहीणी जेव्हा एखाद्या प्राण्यावर हल्ला करते, तेव्हा आपले दात तिच्या मानेत घुसवते. आपली नखं आणि दात यांचा वापर करून समोरच्या प्राण्याला गुडघ्यावर आणते आणि मग शिकार करते. एखाद्या प्राण्याच्या मानेवर वार केल्यानंतर तो प्राणी अर्धमेला होतो आणि त्याची शिकार करणं सोपं जातं. त्यासाठी वाघ किंवा सिंह हे प्रत्येक प्राण्याच्या मानेला निशाणा बनवताना दिसून येतात.

सिंहीणीने झेब्र्याच्या पिल्लाचा ताबा घेतलाच होता. त्याच्या मानेचा घोट घेऊन त्याला ठार करण्याच्या बेतात ती असतानाच झेब्रा आईने सिंहीणीला जोरदार लाथ मारून मागे ढकलले. अचानक झालेल्या या हल्ल्याने सिंहीणीही काहीशी चपापली. मात्र सिंहीणी प्रचंड भुकेली असल्याने तिने आपली शिकार न सोडण्याचा निर्णय़ घेतला आणि पुन्हा एकदा पिल्लावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

शिकार करणाऱ्या सिंहीणीला झेब्र्यानं चांगलीच झुंज दिली. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी जिवाची पर्वा न करता तिने सिंहीणीसोबत संघर्ष सुरू ठेवला. झेब्र्याचा जोष पाहून सिंहीणीही मग गांगरली आणि तिने माघार घेतली. त्यानंतर आपल्या पिल्लाला घेऊन झेब्र्यानं तिथून काढता पाय घेतला. आपल्या डोळ्यांदेखत आपली शिकार घेऊन जाणाऱ्या झेब्र्याकडे पाहत राहण्याशिवाय सिंहीणीकडे कुठलाच पर्याय उरला नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम