शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: हिरोगिरी करायला गेला अन् पस्तावला! तरुणीला घेऊन स्टंट करत होता अन् तोंडघशी पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 21:01 IST

एखादी तरुणी समोर दिसली किंवा बाईकवर पाठीमागे एखादी तरुणी बसली असली की तिला इम्प्रेस करण्याच्या नादात बाईकवर अशी स्टाईल मारतात (Bike collided with scooty). पण ही हिरोगिरी किती महागात पडू शकते, हेच दाखवून देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

फिल्ममध्ये हिरो ज्यापद्धतीने वाऱ्याच्या वेगाने सुसाट बाईक चालवतो किंवा बाईकवर स्टंट करतो, ते पाहून प्रत्यक्षातही बरेच तरुण अशी हिरोगिरी करायला जातात. एखादी तरुणी समोर दिसली किंवा बाईकवर पाठीमागे एखादी तरुणी बसली असली की तिला इम्प्रेस करण्याच्या नादात बाईकवर अशी स्टाईल मारतात (Bike collided with scooty). पण ही हिरोगिरी किती महागात पडू शकते, हेच दाखवून देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Bike accident video viral).

एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडसोबत बाईक चालवत होता. त्याने बाईकचा स्पीड इतका ठेवला होता की भयंकर दुर्घटना झाली. तरुण आणि त्याच्यासोबत बसलेली तरुणी दोघंही हवेत उडाले. इतकंच नव्हे तर या बाईकमुळे एका स्कूटीचालकाचाही अपघात झाला. अपघाताची ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

व्हिडीओत पाहू शकता एक तरुण वेगाने बाईक चालवतो आहे. त्याची बाईक थांबते ती एका स्कुटीला धडकल्यानंतरच. दुसऱ्या एका बाजूने स्कुटी येत असते या स्कूटीलाच ही बाईक धडकते. एकमेकांना धडकताच स्कूटी आणि बाईक दोन्ही दूरवर जाऊन कोसळतात. अपघात पाहता दोघांनाही गंभीर दुखापत झालीच असावी असं दिसून येतं.

तुम्ही व्हिडीओ नीट पाहाल तर फक्त बाईकस्वाराचीच नव्हे तर स्कूटीचालकाचीही चुकी असल्याचं दिसतं आहे. जिथं बाईकस्वार वाऱ्याच्या वेगाने बाईक पळवत होता तिथं स्कूटीस्वार नीट लक्ष देताच रोड क्रॉस करत होता. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांनी या चालकांना सुनावलं आहे. तर काहींनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम