शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अजगरासोबत मस्ती करायला गेला अन् खेळ अंगाशी आला, पुढे जे घडलं ते होतं धक्कादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 17:07 IST

एका व्यक्तीने मस्ती करण्यासाठी चक्क विशालकाय अजगरालाच आपल्या खांद्यावर घेतलं (Video of Man Playing With Python). यानंतर जे काही घडलं ते पाहून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल.

सापाचं नाव ऐकताच अनेकांना घाम फुटतो. सापाने चावा घेतल्यास अनेकांचा जीवही जातो. याच कारणामुळे केवळ माणूसच नाही तर मोठमोठे प्राणीही सापाला पाहून आपला रस्ता बदलतात. मात्र एका व्यक्तीने मस्ती करण्यासाठी चक्क विशालकाय अजगरालाच आपल्या खांद्यावर घेतलं (Video of Man Playing With Python). यानंतर जे काही घडलं ते पाहून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल. हा व्हिडिओ (Shocking Video of Python) पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. काहींनी या व्यक्तीच्या कृत्याला वेडेपणा म्हटलं आहे तर काहींनी म्हटलं की साप कधीच माणसाचे मित्र होऊ शकत नाहीत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक तरुण भल्यामोठ्या अजगराला आपल्या खांद्यावर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. तुम्ही पाहू शकता की हा साप किती मोठा आणि भीतीदायक आहे. या अजगराला खांद्यावर घेताच तरुणाच्या चेहऱ्यावर हसू येतं. मात्र पुढच्याच क्षणी आपल्यासोबत काय होणार आहे, याचा अंदाजही त्याला नव्हता. अजगर लगेचच एखाद्या गोष्टीला विळखा घालतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे.

या घटनेतही अगदी असंच घडलं. अजगराने या तरुणालाच विळखा घालायला सुरुवात केली. पाहता पाहता त्याची अवस्था खराब होऊ लागली. हे पाहून आसपासच्या लोकांनी त्याला अजगराच्या तावडीतून सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हे दृश्य खरंच हैराण करणारं आहे. काहीच सेकंदाचा हा हैराण करणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. काहीच तासात 2 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. अनेकांनी या मुलाच्या कृत्याला वेडेपणा म्हटलं आहे, तर अनेकांना या अजगराचा रंग आवडला आहे.

एका यूजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, की साप कधीच माणसांचे मित्र होऊ शकत नाहीत, असं करणं म्हणजे वेडेपणा आहे. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, या अजगराला पाहून असं वाटतं की तो कोणालाही एका झटक्यात गिळून घेईल. आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, हा मुलगा वेडा आहे. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाsnakeसापInstagramइन्स्टाग्राम