शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

रशियन महिलेला पाहून तरुणाने म्हटलं '६००० रुपये'; पत्नीबाबत लाजिरवाणं वाक्य ऐकून संतापला पती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 14:46 IST

राजस्थानमध्ये रशियन महिलेला पाहून भारतीय तरुणाने केलेल्या अश्लील कमेंटमुळे नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Udaipur Viral Video: आपल्या कुटुंबातील स्त्रियांना बाहेर सन्मानपूर्वक वागणूक मिळावी असं जेव्हा वाटतं तेव्हा त्याची सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी. जसे तुम्ही इतरांच्या आई, बहीण आणि पत्नीसोबत करता तशीच वागणूक तुमच्याही कुटुंबालाही मिळू शकते. याची अनेकांना कल्पना असूनही ते इतर महिलांची छेड काढण्यासारखे प्रकार करत असतात. अशातच राजस्थानमध्ये एका परदेशी महिलेवर अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार महिलेच्या पतीसमोरच घडला जो भारतीय आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या तरुणावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

सोशल मिडियावर बंधणे नसल्याने अनेक नको त्या गोष्टीही सहजपणे फॉरवर्ड होताना दिसतात. एखादी वाईट गोष्ट क्षणार्धात लाखो-कोटी लोकांपर्यंत पोहोचते.  गेल्या काही काळापासून, अनेक स्टँड अप कॉमेडियन रशियन महिला आणि मुलींबद्दल असभ्य विनोद करताना दिसतात. युट्यूबर मिथिलेश आपल्या पत्नीसह राजस्थानमधील उदयपूर येथील सिटी पॅलेसला भेट देण्यासाठी गेला आहे. त्यावेळी एका तरुणाने त्याच्या बायकोला पाहून '६ हजार' असं म्हटलं. यामुळे दुखावलेला मिथिलेशने त्या तरुणाचा व्हिडिओ काढला आणि त्याला चांगलेच सुनावलं.

मुंबईतील ट्रॅव्हल ब्लॉगर मिथिलेश आपल्या रशियन पत्नी आणि मुलासह उदयपूर किल्ल्यात फिरत होता. तेव्हा तिथून जाणारा एक तरुण त्याच्या पत्नीला पाहून अश्लील कमेंट केली. त्या तरुणाने मिथिलेशच्या बायकोला पाहिलं आणि ६ हजार रुपये असं म्हटलं. त्यानंतर ब्लॉगर मिथिलेशने त्या तरुणाला बोलवलं आणि तू सहा हजार म्हटलं ते मी ऐकलं असं सांगितले. त्यानंतर मिथिलेश कॅमेरा त्या तरुणाकडे दाखवून, मी माझ्या कुटुंबासह जात आहे, माझी पत्नी रशियन आहे. तू सहा हजार असं म्हटलं, असं म्हणताना दिसत आहे.

यानंतर मिथिलेश तिथे उपस्थित असलेल्या इतर लोकांना सांगतो की, "मी माझ्या पत्नीसोबत जात आहे आणि हा अश्लील कमेंट करत आहे. पोलिसांना बोलवा." यानंतर बिथरलेला तरुण मी तुम्हाला बोललो नाही असं वारंवार म्हणत होता. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

दरम्यान, या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी छेड काढणाऱ्या भारतीय तरुणाला धारेवर धरलं आहे. ग्रामीण भागातल्या तरुणांमुळे भारताची प्रतिष्ठा खराब होत आहे यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर नियंत्रण कसे ठेवायचे माहीत नाही, पण ते थांबवणे गरजेचे आहे, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. आणखी एका युजरने ,"भारतात कुठेही जा आणि गोरी त्वचा असलेले लोक पाहून लोक घाणेरड्या कमेंट करू लागतात."

टॅग्स :Rajasthanराजस्थानSocial Viralसोशल व्हायरल