दैनंदिन जीवनात आता क्यूआर कोडचा वापर सामान्य झाला आहे. आजकाल प्रत्येक दुकानात QR कोड असतोच आणि लोक QR कोडद्वारे हमखास ऑनलाईन पेमेंट करतात. जर तुम्हीही QR कोड वापरत असाल तर तुम्हाला त्याचा फुलफॉर्म माहीत आहे का? बऱ्याच लोकांना त्याबाबत माहीत नसल्याने जाणून घेऊया...
क्विक रिस्पॉन्स कोड (Quick Response Code) असा क्यूआर कोडचा फुलफॉर्म आहे. हा एक प्रकारचा मॅट्रिक्स बारकोड आहे. १९९४ मध्ये जपानी कंपनी डेन्सो वेव्हने तो बनवला होता. हे मशीन-रिडेबल लेबल आहे, जे संगणक सहजपणे समजू शकतो.
QR कोडमध्ये, तुम्हाला बारकोड सारख्या छोट्या रेषा दिसणार नाहीत तर बरेच ठिपके दिसतील. QR कोडचे दोन प्रकार आहेत, पहिला स्टॅटिक QR कोड आणि दुसरा डायनॅमिक QR कोड.
स्टॅटिक क्यूआर कोड हा स्थिर असतो, म्हणजेच एकदा तो जनरेट झाल्यानंतर तो बदलता येत नाही. तर डायनॅमिक क्यूआर कोडमध्ये असलेली माहिती वारंवार अपडेट केली जाऊ शकते. QR कोडचा वापर करून पेमेंट करणं आता मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.