गोष्ट आहे चीनमधली. चीनमधील एका इन्फ्लूएन्सरचं-कंटेंट क्रिएटरचं लाइव्ह स्ट्रिमिंग सुरु होतं. ही इन्फ्लूएन्सर चीनमध्ये खूपच पॉप्युलर. तिचे लाखो चाहते आहेत आणि सबस्क्रायबर्सही! कार्यक्रम नेहमीप्रमाणे रंगात आला होता. ती इन्फ्लूएन्सर आपलं कसब आणि कौशल्य वापरून लाइव्ह स्टिमिंग उत्तम कसं होईल, याचा प्रयत्न करीत होती. अनेक जण तो कार्यक्रम ऑनलाइन पाहत होते.
अचानक... तिच्या चेहऱ्यावर लावलेला ब्यूटी फिल्टर काही क्षण बंद झाला. किती वेळ? फक्त चार सेकंद ! पण या चार सेकंदांत प्रेक्षकांना तिचा फिल्टर नसलेला खरा चेहरा दिसला आणि त्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. तिचं वागणं, बोलणं, दिसणं, तिची सुंदरता, तिच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्स आणि तिचं लावण्य यावर दर्शक, विशेषतः तरुणाई फारच फिदा होती. पण, ज्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचा
फिल्टर बंद झाला आणि तिचं 'खरं' रूप लोकांना दिसलं, त्यावरून मोठा गहजब उडाला. अरे, 'हीच का ती?' असा प्रश्न अनेकांना पडला.
आधी जो चेहरा सुंदर, पोर्सिलेनच्या बाहुलीसारखा गुळगुळीत, चमकदार आणि कमालीचा आकर्षक दिसत होता, तो नैसर्गिक रंगात आणि अतिशय सामान्य दिसू लागला. डोळे लहान आणि जॉलाइन कमी शार्प झाली. त्यानंतर काही क्षणांतच फिल्टर पुन्हा अॅक्टिव्ह झालं. तिचे डोळे पुन्हा मोठे झाले, त्वचा आधीसारखी स्वच्छ, चमकदार आणि गुळगुळीत दिसू लागली. या महिलेची ओळख अद्याप अज्ञात आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं होऊनही कंटेन्ट क्रिएटर घाबरली नाही, अस्वस्थ झाली नाही. प्रसंगावधान राखून तिनं आपले केस नीट केले, कॅमेऱ्याकडे पाहून हसली आणि काही घडलंच नाही, अशा थाटात लाइव्ह स्ट्रिमिंग तिनं सुरू ठेवलं. पण, जे व्हायचं होतं, तेच झालं. या चार सेकंदांनी घात केला. या एका घटनेनं लगेचच तिचे जवळपास दीड लाख फॉलोअर्स कमी झाले. जगभरात सध्या ही घटना गाजते आहे.
या घटनेचे क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि डिजिटल ब्यूटी स्टँडईस तसंच ऑनलाइन परफॉर्मन्सच्या दबावावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ही घटना अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा चीनमध्ये लाइव्ह स्ट्रीमिंग इंडस्ट्री वेगानं वाढते आहे.
अनेक कंटेन्ट क्रिएटर्स डॉयिनसारख्या प्लॅटफॉर्मवर तासन्तास लाइव्ह असतात, ते प्रेक्षकांशी संवाद साधतात, परफॉर्म करतात किंवा वेगवेगळी प्रॉडक्ट्स प्रमोट करतात. या प्लॅटफॉर्म्सवर डोळे मोठे दाखवणारे, त्वचा गुळगुळीत करणारे आणि चेहऱ्याची रचना आकर्षक करणारे फिल्टर्स आता सर्वसामान्य झाले आहेत. अनेक क्रिएटर्स 'एंगेजमेंट' अर्थात प्रेक्षकसंख्या, व्ह्यूज वाढवण्यासाठी हे फिल्टर्स आवर्जून वापरतात. त्यांच्यासाठी ते अत्यावश्यक टूल झालं आहे. पण, त्यामुळेच अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत.
या घटनेची तुलना २०१९ मधील अशाच एका प्रसंगाशी केली जात आहे. त्या वेळी 'युअर हायनेस कियाओ बिलुओ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्ट्रीमरचा ब्यूटी फिल्टर लाइव्ह स्ट्रीमदरम्यान चुकून बंद झाला होता. तरुण, सुंदर लूक आणि गोड आवाज यावर तिनं मोठा फॉलोअर्स बेस तयार केला होता, पण फिल्टरमध्ये गडबड झाल्यानंतर ती प्रत्यक्षात ५८ वर्षाची असल्याचं समोर आलं होतं!
Web Summary : A Chinese influencer's beauty filter glitch revealed her unfiltered appearance during a live stream. The incident, lasting mere seconds, led to shock among viewers and a loss of 150,000 followers, sparking debate on digital beauty standards.
Web Summary : चीनी इन्फ्लुएंसर का लाइव स्ट्रीम के दौरान ब्यूटी फिल्टर बिगड़ने से असली चेहरा दिखा। इस घटना से दर्शक चौंक गए और 1.5 लाख फॉलोअर्स कम हो गए, जिससे डिजिटल सौंदर्य मानकों पर बहस छिड़ गई।