शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर चढला बोहल्यावर; पहिल्याच नजरेत प्रेम अन् 4 वर्षांनी उरकलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 16:18 IST

pratik mohite bodybuilder: जगातील सर्वात लहान बॉडी बिल्डर विवाहबंधनात अडकला आहे.

pratik mohite bodybuilder wife । मुंबई : हे सोशल मीडियाचे युग आहे, इथे कधी कोण प्रसिद्धीच्या झोतात येईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. माणसाची समाजातील उंची त्याच्या सौंदर्यावर नसून त्याच्या धाडसाच्या आधारे मोजली जाते. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे 3.3 फूट प्रतिक मोहिते. जगातील सर्वात तरुण बॉडी बिल्डर म्हणून 28 वर्षीय प्रतीकचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. नुकताच प्रतिक विवाहबंधनात अडकला असून लोक त्याला शुभेच्छा देत आहेत. प्रतिकने इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यात तो त्याच्या लग्नाच्या मिरवणुकीचा आनंद लुटताना दिसत आहे.

प्रतिक रायगडचा रहिवासी असून त्याची पत्नी पुण्यातील असल्याचे तो सांगतो. प्रतिकची उंची 3 फूट 34 इंच असून त्याची पत्नी 4 फूट 2 इंच एवढ्या उंचीची आहे. प्रतिकने सांगितले की, 4 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनी त्याची आणि जयाची भेट घडवून आणली होती. याचदरम्यान प्रतिक जयाच्या प्रेमात पडला होता.

... म्हणून 4 वर्षे केलं नाही लग्नप्रतिकने सांगितले की, "मी सर्वप्रथम 2018 मध्ये जयाला भेटलो होतो आणि मी बॉडीबिल्डिंगला 2016 मध्ये सुरूवात केली होती. जयाला भेटल्यानंतर मी तितकासा यशस्वी झालो नव्हतो. कारण लग्नानंतर जयाची जबाबदारी माझ्यावर पडणार हे मला माहिती होते. मी जयाला सांगितले की, मी सर्वप्रथम स्वत:च्या पायावर उभा राहिन आणि मग तुझ्याशी लग्न करेन. हळू हळू वेळ जात गेला आणि मला यश मिळत गेले. माझे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे आणि मी फिटनेस ट्रेनर बनलो आहे. जेव्हा मला वाटले की मी माझ्या पायावर उभा राहिलो आहे तेव्हाच मी लग्न केले." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवguinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डRaigadरायगडSocial Viralसोशल व्हायरलmarriageलग्न