शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

37000 फूट उंचीवर महिलेने विमानाचा दरवाजा उघडला, म्हणाली - देवाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 18:45 IST

अमेरिकेतील फ्लाइटमध्ये बसलेल्या एका महिला प्रवाशाने फ्लाइट 37,000 फूट उंचीवर विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

अमेरिकेतील फ्लाइटमध्ये बसलेल्या एका महिला प्रवाशाने फ्लाइट 37,000 फूट उंचीवर विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. हे करण्याआधीच एका प्रवाशाने त्या महिलेला थांबवले.  यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करून महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी पोलिसांसमोर या महिलेने देवाने असं करण्यास सांगितल्याचे सांगितले.  34 वर्षीय अलोम एग्बेग्निनाऊ ह्यूस्टन, टेक्सास येथून कोलंबस, ओहायोला जाणाऱ्या साउथवेस्ट एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये बसली होती. ती अचानक जागेवरून उठली आणि दरवाजापाशी जाऊन ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागली. यावेळी दारावर डोकं आपटत होती की येशूने तिला ओहायोला जाण्यास सांगितले आहे आणि आता दरवाजा उघडण्यास सांगत आहे, असं ती ओरडू लागली. 

रडणाऱ्या ताईला पाहून कासाविस झालाय चिमुकला, बघा तिला कसं समजावतोय... व्हायरल इमोशनल व्हिडिओ 

महिलेचे हे कृत्य पाहून विमानातील इतर प्रवासी घाबरले. मोठा अनर्थ घडू शकतो अस त्यांच्या लक्षात येताच काही प्रवाशांनी महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला, यावेळी तिने एका प्रवाशाला अडवले. विमानाचे अर्कान्सासमधील बिल आणि हिलरी क्लिंटन राष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यानंतर क्रू मेंबर्सनी महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले.

सोमवारी, पूर्व डिस्ट्रिक्ट ऑफ अर्कान्साससाठी जिल्हा न्यायालयाकडून एक निवेदन जारी केले आहे. यात ती महिला वेडसर असल्याचे म्हटले आहे. 

या संपूर्ण प्रकरणावर महिला म्हणाली, मी खूप दिवसांपासून प्रवास केला नाही आणि मी खूप काळजीत होते. मी शनिवारी माझ्या पतीला न सांगता आणि मेरीलँडमधील कौटुंबिक मित्राला भेटण्यासाठी कोणत्याही बॅगशिवाय घर सोडले. सहसा मी अशा गोष्टी अजिबात करत नाही. विमानात महिलेवर प्राणघातक हल्ला आणि क्रू मेंबर्ससोबत हाणामारी केल्याप्रकरणी तपास सुरू आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके