क्या बात! ...म्हणून ती घोड्याला घेऊन गेली विमानात, तुम्हालाही वाटेल कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 01:32 PM2019-09-03T13:32:55+5:302019-09-03T13:36:53+5:30

वेगवेगळ्या एअरलाईन्समध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या विचित्र घटना आपण नेहमीच वाचत असतो. अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना वेगळी नक्कीच आहे, पण विचित्र म्हणता येणार नाही.

woman pictured sitting emotional support horse in plane news goes viral | क्या बात! ...म्हणून ती घोड्याला घेऊन गेली विमानात, तुम्हालाही वाटेल कौतुक!

क्या बात! ...म्हणून ती घोड्याला घेऊन गेली विमानात, तुम्हालाही वाटेल कौतुक!

Next

वेगवेगळ्या एअरलाईन्समध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या विचित्र घटना आपण नेहमीच वाचत असतो. अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना वेगळी नक्कीच आहे, पण विचित्र म्हणता येणार नाही. अमेरिकन एअरलाइन्समध्ये शिकागोहून Omaha, Nebraska जात होती. आणि ती तिच्यासोबत चक्का घोडा घेऊन आली. आता एअरपोर्टवर घोडा पाहिल्यावर सर्वांना धक्का बसणं आलंच. पण ती घोड्याला सोबत घेऊन येण्यामागे एक खास कारण होतं. घोडा मानसिक समस्यांमधून जात होता. त्यामुळे ती त्याला विमानात घेऊन गेली.

या घोड्याचं नाव आहे Flirty. अमेरिकेत जनावरांबाबत वेगवेगळे कायदे आहेत. काही परिस्थितींमध्ये जनावरांना विमानात घेऊन जाण्याची देखील परवानगी असते. बस त्यासाठी योग्य कारण हवं असतं. Flirty मेंटल हेल्थ संबंधी समस्यांचा शिकार आहे. आणि यापेक्षा मोठं कारण काय असू शकतं?

Flirthy The Mini Service Horse नावाने एक इन्स्टाग्राम पेज तयार करण्यात आलं आहे. या पेजचे ८ हजार फॉलोअर्सही आहेत.

पाळीव प्राण्यांबाबत असं मानलं जातं की, जेव्हा ते डिप्रेशनचे शिकार असतात तेव्हा त्यांनी जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळावं. याने ते डिप्रेशनमधून बाहेर येण्यास मदत मिळते. या प्रक्रियेला इमोशनल सपोर्ट म्हणतात.

Web Title: woman pictured sitting emotional support horse in plane news goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.