शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

Viral Video: तरुणीने चित्त्याला असं किस केलं जणून काही मांजरीलाच किस करतेय, पण पुढे घडलं भलतंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 18:30 IST

एका महिलेने थेट चित्त्यालाच (Woman kissing cheetah) किस देण्याचा प्रयत्न केला आहे (cheetah video).

काही जणांचं प्राण्यांवर इतकं प्रेम असतं की ते प्राणी म्हणजे त्यांचा जीवच असतो (Human animal love video). अगदी आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे ते प्राण्यांना जपतात. कुत्रा, मांजर यांचे असे बरेच व्हिडीओ (Animal love video) तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. ज्यात त्यांचे मालक त्यांच्यासोबत मस्ती करताना, त्यांना प्रेमाने गोंजारताना, अगदी त्यांची किस घेतानाही दिसतात. पण एका महिलेने थेट चित्त्यालाच (Woman kissing cheetah) किस देण्याचा प्रयत्न केला आहे (cheetah video).

चित्ता म्हटलं तरी आपल्या अंगाला घाम फुटतो. अगदी नॅशनल पार्क, जंगल सफारी, प्राणीसंग्रहालयात गेल्यावर दुरून चित्ता पाहिला तरी आपला थरकाप उडतो. चित्ता अगदी जवळ आला तर मग आपला जीव गेल्यातच जमा. पण ही महिला मात्र अगदी जणू कुत्रा-मांजरच असावा असं चित्त्याजवळ बसली आहे. इतकंच नव्हे तर चित्त्याला तिने किसही केलं. पुढे या महिलेसोबत काय घडलं पाहा.

जिओसफारीज नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात ही महिला चित्त्यासोबत दिसते आहे. चित्त्याच्या शेजारी ती एकदम बिनधास्तपणे बसलेली दिसते. कॅमेऱ्याकडे पाहता पाहता ती अचानक चित्त्याच्या तोंडावर किस देते. तेव्हा आपले हार्टबीट्स वाढतात. पण या तरुणीच्या चेहऱ्यावर कोणतीच भीती दिसत नाही. ती हसताना दिसते.

यानंतर चित्त्याने जे केलं ते यापेक्षा शॉकिंग आहे. चित्ताही तिच्याकडे आपलं तोंड करतो आणि तिच्या गालाला आपल्या जिभेने चाटतो. एरवी कुत्रा-मांजर जसे माणसांवर प्रेम करताना त्यांना आपल्या जिभेने चाटतात तसाच हा चित्ताही प्रेम व्यक्त करताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम