शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कॉफीऐवजी पाजले चक्क केमिकल, महिलेने रेस्टॉरंटकडून 105 कोटी रूपयांची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 16:29 IST

कॉफीऐवजी केमिकल दिले म्हणून मॅकडोनाल्ड कंपनीकडून महिलेने 105 कोटींची मागणी केली. 

नवी दिल्ली : एका महिलेने प्रसिद्ध फास्ट फूड चेन मॅकडोनाल्डच्या (Mcdonald's) विरोधात तक्रार दाखल केली असून कंपनीकडून तब्बल 105 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. महिलाचा दावा आहे की तिने कॉफी ऑर्डर केली मात्र त्या बदल्यात तिला केमिकल सर्व्हिस देण्यात आली. यामुळे तिला आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचीच भरपाई म्हणून तिने कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

कॉफीऐवजी दिले चक्क केमिकलया महिलेचे नाव शेरी हेड असे आहे. मॅकडोनाल्डच्या अमेरिकेतील एका शाखेविरुद्ध तिने ही तक्रार नोंदवली आहे. शेरीने एक Caramel Macchitato ऑर्डर केले होते. मात्र कॉफीऐवजी तिला केमिकलने भरलेला एक कप मिळाला, असा शेरीने दावा केला आहे. केमिकलमुळे तिला घशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय इतर समस्यांचा देखील शेरीला सामना करावा लागत आहे. याशिवाय या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तिला सर्जरी करावी लागू शकते, असे शेरीने सांगितले. 

"मी कॉफीचा एक घोटा घेतला आणि लगेचच माझा घसा बसला. यानंतर माझ्या तोंडात आणि घशामध्ये जळजळ व्हायला लागली. आता माझ्या घशामध्ये सतत त्रास जाणवत आहे आणि त्यामुळे मला सर्जरी करण्याची गरज भासू शकते", असे शेरीने म्हटले. तर शेरीने तक्रार दाखल केल्यानंतर मॅकडोनाल्डचे स्टाफ तिच्यावर भडकले असल्याचे तिच्या वकिलांनी सांगितले.

105 कोटी रूपयांची केली मागणी फॉक्स न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, शेरीने तिच्या तक्रारीत नुकसान भरपाईसाठी सुमारे 24 कोटी रुपये आणि दंडात्मक नुकसानीसाठी सुमारे 81 कोटी रुपयांची मागणी केली आहे. 21 डिसेंबर 2021 च्या या घटनेबद्दल बोलताना शेरी म्हणाली की, "मी घाबरले होते. मी केमिकल लिक्विड प्यायले आणि असे वाटले की कोणालाच माझी काळजी नाही."

 

टॅग्स :AmericaअमेरिकाSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाCourtन्यायालय