शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:09 IST

पौराणिक कथेनुसार नैसर्गिक आपत्ती पूर्वसूचना देण्यासाठी हा मासा समुद्राच्या पृष्ठभागावर येतो

Doomsday fish News: यावर्षी(2025) आतापर्यंत अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत. जगभरातच नाही, तर भारतातही एकामागून एक धक्कादायक घटना घडत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ला असो, अहमदाबाद विमान अपघात असो किंवा इतर अनेक घटना असो...ठराविक अंतराने काही ना काही विपरित घडत आहे. अशातच आता तामिळनाडूतील मच्छिमारांच्या जाळ्यात 'ओअरफिश' किंवा 'डूम्स डे फिश' सापडल्याने मोठ्या घटनांची शक्यता वर्तवली जात आहे. 

लोकांमध्ये भीती...ओअरफिश हा खोल समुद्रात राहणारा, लांब आकाराचा आणि चकाकणाऱ्या शरीराचा दुर्मीळ मासा आहे. जपानी पौराणिक कथेनुसार या माशाला समुद्र देवाचा दूत मानले जाते. लोककथांनुसार त्याचं वर येणे, हे काहीतरी अघटित घडण्याची शक्यता दर्शवते. असे म्हटले जाते की, नैसर्गिक आपत्ती पूर्वसूचना देण्यासाठी हा मासा पाण्याच्या पृष्ठभागावर येतो. आता हा मासा भारतीय मच्छिमारांच्या जाळ्यात सापडल्याने चर्चेचा विषय बनला आहे. या माशाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

चारवेळा दिसला डूम्स डे मासाविशेष म्हणजे, या वर्षी मे महिन्यापासून चार वेळा हा मासा समुद्रकिनाऱ्यावर दिसला आहे. सोशल मीडियावर या माशाचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे, आता कोणती आपत्ती येणार? असा प्रश्न विचारला जातोय. तामिळनाडूत सापडलेला मासा सुमारे 30 फूट लांब असून, व्हायरल व्हिडिओमध्ये 7 मच्छिमार त्याला हातात घेऊन उभे असल्याचे दिसत आहेत. विशेष म्हणजे, जूनच्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या किनाऱ्यावर दोन ओअरफिशचे मृतदेह आढळले होते. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलTamilnaduतामिळनाडूSocial Mediaसोशल मीडिया