उद्योगपती आनंद महिंद्रासोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. वेगवेगळ्या मुद्द्यांवर, घडामोडींवर ते व्यक्त होत असतात. आता आनंद महिंद्रा यांनी भारतीय वंशांचे काश पटेल यांची एफबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल पोस्ट केली. आनंद महिंद्रा यांनी काश पटेलांचे कौतुक केले. त्यावर एका यूजरने आनंद महिंद्रांकडे काश पटेल यांना थार गाडी गिफ्ट देण्याची मागणी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महिंद्रा उद्योग समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. वेगवेगळ्या घटनांबद्दल ते पोस्ट करत असतात. काही प्रेरणादायी व्हिडीओही ते पोस्ट करतात. दरम्यान, अमेरिकेच्या एफबीआयच्या संचालकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महिंद्रांनी काश पटेल यांचे कौतुक करणारी पोस्ट केली.
आनंद महिंद्रा काश पटेल यांच्याबद्दल काय म्हणाले?
आनंद महिंद्रांनी एक्सवर काश पटेल यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. ते म्हणाले, "एफबीआयचे नवे संचालक काश पटेल. असे वाटत नाही का की, या व्यक्तीसोबत कुणीच वाद करणार नाही. लक्षात ठेवा."
आनंद महिंद्रा यांच्या पोस्टवर हर्षित नावाच्या एका युजरने कमेंट केली. 'यांनाही थार गिफ्ट करा सर', अशी मागणी यूजरने आनंद महिंद्रांकडे केली.
मिश्कील अंदाजात दिले उत्तर
या यूजरला आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या नेहमीच्या मिश्कील अंदाजात उत्तर दिले. महिंद्रा म्हणाले, 'हो. हा व्यक्ती थारच्या लायकीचा दिसत आहे.' महिंद्रांनी उत्तर दिलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे महिंद्रा काश पटेल यांना थार गाडी गिफ्ट करणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
आनंद महिंद्रांनी अनेक व्यक्तींना थार केलीये गिफ्ट
आनंद महिंद्रा यांनी यापूर्वी अनेकांना थार गाडी गिफ्ट दिली आहे. यामध्ये दिव्यांग तिरंदाज शीतल देवी हिला महिंद्रा स्कॉर्पिओ गिफ्ट केली होती. तर फलंदाज सर्फराज खान याच्या वडिलांना थार गिफ्ट दिली होती.