शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Santa Claus नेहमी पुरूषच का असतो? कधी केलाय का तुम्ही या गोष्टीचा विचार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:34 IST

Interesting Facts : Santa Claus नेहमी पुरूषच का असतो, एखादी महिला किंवा मुलगी का नसते? जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर...

Interesting Facts :  सोशल मीडियाच्या या महाजाळात इतकी वेगवेगळी माहिती फिरत असते ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर इथे सहज मिळू शकतं. रोज हजारो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले जातात, पण त्यातील मोजकेच म्हणजे हटके असेच व्हिडीओ, उत्सुकता वाढवणारे किंवा लोकांच्या मनातील प्रश्नाचे उत्तर देणारे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ काहीतरी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढवतात. असाच एक साधा पण तेवढीच उत्सुकता वाढवणारा व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अनेकांच्या मनात येणारा असा प्रश्न विचारण्यात आला आहे. ज्याचं उत्तर व्हिडिओत नाही, पण आम्ही देणार आहोत.

आता जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एका तरूणाने एका व्यक्तीसमोर माइक धरून प्रश्न विचारला की, Santa Claus नेहमी पुरूषच का असतो? नक्कीच हा प्रश्न उत्सुकता वाढवणाराच आहे. पण व्यक्तीच्या उत्तराने पूर्ण व्हिडिओला कॉमेडीमध्ये बदललं. तो फार गंभीर हावभाव करत म्हणतो की, 'कारण सर कोणतीही मुलगी दरवर्षी सेम कपडे घालू शकत नाही. तेही त्याच उत्सवाला. कधीच नाही'. हा एक स्क्रीप्टेड फनी व्हिडीओ आहे, जो व्हायरल झाला आहे.

पण खरंच Santa पुरूषच का असतो?

खरंतर अनेकांच्या मनात Santa Claus हा पुरूषच का असतो? असा प्रश्न कधीना कधी येत असेलच. पाहुयात मग याचं उत्तर. तर सांताची जी कथा आहे ती चौथ्या शतकातील एका दयाळू बिशपची आहे. त्यावेळी एक सेंट निकोलस नावाची एक व्यक्ती होती आणि ती आपल्या दिलदारपणासाठी ओळखली जात होती. तो गपचूप लहान मुलांना आणि गरीबांना गिफ्ट देत होता. त्यांची मदत करत होता. त्यामुळे तो लहान मुलांचे संरक्षक बनले. बालपणीच निकोलसचे आई-वडील वारले आणि मागे सोडून गेले अमाप संपत्ती. या संपत्तीच्या मदतीने निकोलस आरामात जगू शकला असता. पण त्याने सेवेचा मार्ग निवडला. इथून सुरू झाला निकोलसचा सेंट निकोलस बनण्याचा प्रवास.

एकदा एका गावात एक गरीब व्यक्ती राहत होती. त्याला तीन मुली होत्या. त्यांच्या लग्नासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. तो आपल्या मुलींच्या चुकीच्या मार्गाला लावणार होता. हे निकोलसला समजलं. तो रात्री लपून गेला आणि त्याने या व्यक्तीच्या घराच्या खिडकीतून सोन्याच्या नाण्यांची एक पिशवी फेकली. सकाळी व्यक्तीला नाणी पाहून आनंद झाला. दुसऱ्या मुलीसाठीही निकोलसने अशीच लपून मदत केली. पण तिसऱ्या वेळी व्यक्तीने निकोलसला असं करताना पकडलं. तेव्हा व्यक्ती निकोलसच्या पायात पडला. तेव्हा निकोलसने एकच अट घातली, ती म्हणजे मदत मी केली हे कुलाही कळता कामा नये. इथून निकोलसला गिफ्ट देण्याची आयडिया आली आणि आपलं काम सुरू केलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Why is Santa Claus always a man? An interesting story.

Web Summary : A viral video raises the question: Why is Santa always male? The story originates from Saint Nicholas, a generous 4th-century bishop who secretly helped the needy, giving gifts anonymously. Thus, he became known as a protector of children.
टॅग्स :ChristmasनाताळInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके