शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियात Click Here चा नवा ट्रेंड, नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 15:02 IST

Click Here चा एक नवा ट्रेंड आलेला पाहायला मिळत आहे. इंटरनेटवर हा ट्रेंड तुफान व्हायरल होत असून राजकीय पक्ष, लोकप्रिय व्यक्तीमत्व, नेते मंडळीसह सर्वसामान्य व्यक्तीही तो फ़ॉलो करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर आपण सर्वजण अ‍ॅक्टिव्ह असतो. मात्र सध्या X म्हणजेच ट्विटरवर आता Click Here चा एक नवा ट्रेंड आलेला पाहायला मिळत आहे. इंटरनेटवर हा ट्रेंड तुफान व्हायरल होत असून राजकीय पक्ष, लोकप्रिय व्यक्ती, नेते मंडळीसह सर्वसामान्य व्यक्तीही तो फ़ॉलो करताना दिसत आहे. Click Here म्हणत पोस्ट करत आहेत. पण Click Here चा हा ट्रेंड नेमका आहे काय आणि याचा कसा वापर करायचा याबाबत जाणून घेऊया...

Click Here च्या पोस्टमध्ये युजर्सना एका पांढऱ्या बॅकग्राऊंडवर काळ्या रंगात Click Here लिहिलेलं दिसतं. या मजकुरासोबत खालच्या दिशेला एक अ‍ॅरो आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर  Click Here च्या अनेक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहेत. ज्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. 

ALT मध्ये मिळेल डिस्क्रिप्शन

Click Here मधील अ‍ॅरो चिन्हाच्या खाली लहान अक्षरात ALT लिहिलेलं आहे. जेव्हा आपण या ALT वर क्लिक करतो, तेव्हा त्याचा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल. या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, युजर्स 1000 कॅरेक्टरपर्यंत मेसेज लिहू शकतात. कंपनीने ट्विटरवर हे फिचर आधीच जारी केलं आहे.

ALT टेक्स्ट म्हणजे नेमकं काय?

X नुसार, जेव्हा तुम्ही या प्लॅटफॉर्मवर एखादी इमेज शेअर करता तेव्हा तुमच्याकडे एक ऑप्शन असतो. तुम्ही त्याच्यासोबत एक डिस्क्रिप्शनअ‍ॅड करू शकता. याच डिस्क्रिप्शनला ALT टेक्स्ट असं म्हटलं जातं. ALT टेक्स्ट हे प्रामुख्याने फोटो ओळखण्यासाठी दृष्टीहीन आणि कमी दिसणाऱ्या लोकांना मदत करतं. फोटो नेमक्या कोणत्या विषयाशी संबंधित आहेत याची माहिती ALT टेक्स्टच्या मदतीने दिली जाते. 

2016 मध्ये ट्विटरने ALT टेक्स्ट फीचर लाँच केलं. त्यावेळी या फीचरबाबत आम्हाला जास्तीत जास्त युजर्सपर्यंत कंटेंट पोहोचवायचा आहे असं सांगितलं होतं. आजकाल हे फीचर Click Here च्या इमेजसह व्हायरल होत आहे.

X वर अशी पोस्ट करण्यासाठी, युजर्सना एक नवीन पोस्ट तयार करावी लागेल. यानंतर, युजर्सना Click Here नावाची इमेज अटॅच करावी लागेल आणि नंतर Add description वर जावे लागेल. यानंतर, जेव्हा तुम्ही पोस्ट करता तेव्हा तुम्हाला फोटोच्या खाली ALT दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही डिस्क्रिप्शन लिहू शकता. 

 

टॅग्स :Twitterट्विटरSocial Viralसोशल व्हायरल