Adult Diapers: सोशल मीडियावर सध्या एका अनोख्या अंडवेअरची चांगलीच चर्चा रंगली आहे. ही काळ्या रंगाची अंडरवेअर चेन आणि स्पाइक्सने सजवली आहे. जी दिसायला अजब वाटते. फोटो बघून तुम्हालाही विचार पडला असेल की, काटे लागलेली ही अंडरवेअर घालणार तरी कोण? पण वाचून आश्चर्ट वाटेल की, ही अंडरवेअर खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही अंडरवेअर लॉन्च झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच सोल्ड आउट झाली. ही अंडरवेअर एका खास उद्देशाने तयार करण्यात आली आहे. डिझाइन आणि अजब फीचर्समुळे ही अंडरवेअर सोशल मीडिया ट्रेंड करत आहे.
किती आहे किंमत?
म्युझिक कॉन्सर्ट्स दरम्यान बाथरूम ब्रेकची चिंता दूर करण्यासाठी 'मेटल म्युझिक'ने आपल्या फॅन्ससाठी ही अनोख्या डिझाइनची अंडरवेअर डिझाइन केली आहे. ज्याला 'पिट डायपर'असं नाव देण्यात आलं आहे. कारण कॉन्सर्ट दरम्यान ही अंडरवेअर घातल्यास बाथरूमला जाण्याची गरजच पडणार नाही. या अंडरवेअरची किंमत ५९ पाउंड म्हणजे भारतीय करन्सीनुसार ६,३३६.१८ रूपये इतकी आहे.
'पिट डायपर' एक अनोखी आणि क्रिएटिव्ह अंडरवेअर आहे. जी म्युझिक कॉन्सर्टच्या फॅन्ससाठी डिझाइन करण्यात आली आहे. ही क्रूएल्टी-फ्री क्विल्टेड लेदरपासून बनवली आहे. सोबतच काही फीचर्स दिले गेले आहेत. या अंडरवेअरची खासियत म्हणजे यातून दुर्गंधी येणार नाही आणि लीकेजही होणार नाही.
'पिट डायपर' मेटल म्युझिक आणि दो प्रसिद्ध ब्रॅंड्स, लिक्विड डेथ आणि डिपेंडने मिळून डिझाइन केली आहे. मेटल म्युझिकचे ड्रमर बेन कोलरने या अनोख्या अंडरवेअरचं प्रमोशन करत सांगितलं की, "कोणताही शो बाथरूम ब्रेकसाठी रोखला जाऊ शकत नाही. पण पिट डायपरमध्ये कोणतंही गाणं मिस केल्याशिवाय स्वत:ला हायड्रेटेड ठेवू शकता".