शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Wedding Invitation: जरा हटके! नवरदेवानं छापलेल्या लग्न पत्रिकेची गावभर चर्चा, घरोघरी जाऊन वाटलं 'आधार कार्ड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 15:23 IST

Wedding Invitation Ideas: आधार कार्डच्या रुपात छापण्यात आलेली लग्न निमंत्रण पत्रिका सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियात ही हटके पत्रिका व्हायरल झाली आहे. 

Aadhar Card Wedding Invitation: लग्न आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचा क्षण असतो आणि तो खास असावा यासाठी प्रत्येकजण काही ना काही विशेष प्रयत्न करतो. आपलं लग्न खास बनवण्यासाठी प्रत्येकजण खास तयारी आणि प्लॅनिंग करतो. याचे अनेक व्हिडिओ देखील तुम्ही सोशल मीडियावर पाहात आले असाल. लग्नाची निमंत्रण पत्रिका देखील हटके अंदाजात छापण्याचा काहींचा प्रयत्न असतो. अशीच एक हटके आणि लक्षवेधी लग्न पत्रिका सध्या चर्चेचा विषय बनली आहे. 

एका जोडप्यानं त्यांच्या लग्नासाठी 'आधार कार्ड'च्या थीमवर तयार केलेलं निमंत्रण तयार केलं आहे. ज्यास लोकांची चांगली पसंती देखील मिळत आहे. या आधार कार्डवर लग्नाच्या निमंत्रणाचा संपूर्ण तपशील खूप हटके पद्धतीनं छापण्यात आला आहे. यात आधार क्रमांकाऐवजी लग्नाची तारीख छापण्यात आली आहे, त्यासोबत बारकोडही देण्यात आला आहे. 

हे कार्ड सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, यासोबतच लोकांना ही क्रिएटिव्ह आयडिया खूप आवडली आहे. संबंधित व्यक्तीनं फक्त डिजिटल कार्ड तयार केल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे कार्ड छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील फरसाभर ब्लॉकमधील अंकिरा गावातील रहिवासी लोहित सिंह नावाच्या तरुणाचं असल्याचं सांगितलं जात आहे. लोहित सिंह अंकिरा गावात एक जनसेवा केंद्र चालवतात, जिथं लोकांचं आधार कार्ड बनवलं जातं. यासोबतच लोहित सिंग इंटरनेट, छपाई, फोटो कॉपी आणि लग्नपत्रिका छपाईचंही काम करतात.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके