शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: काय ती पोरं, काय ट्रक अन् काय तो नागीन डान्स...एकदम हॉर्न 'नॉट' ओक्के!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 18:17 IST

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तरूणाईचा ग्रुप रोडवरून जात असलेल्या ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न करतो.

मुंबई

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या सर्वत्र पावसानं धुमशान घातलं आहे. गावखेड्याकडील धबधब्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात पावसामुळे सर्वत्र हिरवळ पसरली आहे. त्यामुळे या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक धबधब्यांना भेट देत आहेत. यातच पावसात फिरायला जायचं म्हणजे तरूणाईची जणू काही मेजवानीच म्हणावी लागेल. दरम्यान पावसामध्ये फिरायला गेलेल्या मुलांनी ट्रक समोर केलेला एक नागीण डान्स सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहे. तरुणाईच्या या नागीन डान्सचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत असून नेटकरी काही भन्नाच कमेंटस करत आहेत. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तरूणाईचा ग्रुप रोडवरून जात असलेल्या ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात ट्रक चालक हॉर्न वाजवतो योगायोग असा की हॉर्नचा आवाज अगदी नागीन डान्सच्या टोनचा होता. मग काय नागीण डान्सचा हॉर्न वाजताच पठ्ठ्यांनी ठेका धरला अन् एकच कल्ला केला. विशेष म्हणजे डान्स करत असलेले काही तरूण चक्क रस्त्यावर लोळून गाण्याचा आनंद घेत होते. भररस्त्यात असं करणं खरंतर जोखीमेचं आहे कारण पावसाच्या दिवसांमध्ये दरड कोसळण्याची दाट शक्यता असते मात्र तरूणाईने या सर्वांकडे दुर्लक्ष करत आनंद साजरा करताना दिसते. त्यामुळे सध्याच्या व्हायरलच्या भाषेत बोलायचं झालं तर काय ती पोरं, काय डान्स, काय हॉर्न...एकदम 'नॉट' ओक्के असंच म्हणावं लागेल. 

आंबोली घाटातील व्हिडीओने घातला धुमाकूळ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हिडीओ आंबोली घाटातील आहे. मात्र तरूणांच्या या हुल्लडबाजीमुळे घाटातील पर्यटकांना आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला. हा व्हिडीओ व्हायरल होत असला तरी असं करणं जीवावर बेतू शकतं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही मुलं ट्रकच्या पुढे मोटारसायकलवर येतात आणि ट्रक थांबवण्याचा प्रयत्न करतात तेवढ्यात ट्रक चालकाने हॉर्न देताच तरूणाई नागीन डान्सवर कल्ला करण्यास सुरुवात करतात.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाdanceनृत्य